• Mon. Nov 25th, 2024

    समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची धडक, विदर्भाचे माजी रणजी खेळाडू जखमी, पत्नीचा जागीच मृत्यू

    समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची धडक, विदर्भाचे माजी रणजी खेळाडू जखमी, पत्नीचा जागीच मृत्यू

    हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या क्रेटा कार एमएच ३१ एफए ६६२२ याचा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर आणि त्यांचा पत्नी हे पुण्याहून नागपूरला येत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याजवळ येताच समृद्धी महामार्गावरील पुलाखाली सावलीत उभ्या असलेल्या कंटेनरला प्रवीण यांच्या गाडीने जोरदार धडक दिली.

     

    नागपूर:समृद्धी महामार्गावर अपघात आणि बळींची दुर्दैवी मालिका सुरूच आहेत. विदर्भाचे माजी रणजी खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे खेळपट्टीचे क्युरेटर प्रवीण हिंगणीकर यांचा अपघातात झाला आहे. या अपघातात त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रवीण हिंगणीकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेहकरजवळ मंगळवारी दुपारी हा अपघात झाला आहे. हा अपघात किती भीषण होता, यावरूनच या महिलेचे शीर धडापासून वेगळं झाल्याचं समजतं.याबाबात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या क्रेटा कार एमएच ३१ एफए ६६२२ याचा चुराडा झाला आहे. प्रवीण हिंगणीकर आणि त्यांचा पत्नी हे पुण्याहून नागपूरला येत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याजवळ येताच समृद्धी महामार्गावरील पुलाखाली सावलीत उभ्या असलेल्या कंटेनरला प्रवीण यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. यामुळे शेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नीचे थेट डोके शरीरापासून वेगळे झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्वत: कार चालवत असलेले प्रवीण हिंगणीकर यांना ही गंभीर दुखापत झाली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा चुराडा झाला आहे.

    अपघात झाल्यानंतर त्याचवेळी महामार्गावरून जात असलेल्या परिचारिक असलेले पती-पत्नी हे अकोला येथे जात होते. त्यांनी हा अपघात पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ वाहन थांबवून प्रवीणवर प्राथमिक उपचार केले. त्यांनी घटनेची महिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ रुग्णवाहिका घेऊन पोहोचले. यानंतर त्यांना प्रथम मेहकर ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंगणीकर यांना यापूर्वी हात आणि पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली होती. तर, दुसरीकडे हिंगणीकर यांच्या झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने शहरातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed