• Sat. Sep 21st, 2024

ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, आगीदरम्यान वाहनांचा स्फोट, काही जण अडकल्याची भीती

ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, आगीदरम्यान वाहनांचा स्फोट, काही जण अडकल्याची भीती

ठाणे:ठाण्यातील घोडबंदर रोड येथील सिनेवंडर मॉलजवळ ओरियन बिझनेस पार्कला मंगळवारी १८ एप्रिल रात्री ८ वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की पार्कच्या तळ मजल्यावरुन चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे कार्य सुरू केले. या घटनेदरम्यान काही जण अडकले होते. त्यांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे. अजून काहीजण अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीमुळे पार्किंग झोनमध्ये काही गाड्यांचा ब्लास्ट झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे कार्य अद्याप सुरू आहे.ठाण्यातील वर्दळीचे घोडबंदर रोड येथील सिनेवंडर मॉलजवळ असलेल्या ओरियन बिझनेस पार्कच्या मागच्या बाजूला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की आगीने रौद्ररूप धारण केलं आणि बघता बघता तळमजल्यावरील आग ही चौथ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली. या घटनेची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

उद्या सकाळी ७ वाजता पृथ्वीवर संकट कोसळणार; शास्त्रज्ञांना टेन्शन, नासाचं…
या आगीच्या दरम्यान अनेक जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहेत. या आगीत कोणी अडकले आहे का याचे शोधकार्य सुरु आहेत. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या बिझनेस पार्कमध्ये पार्किंग झोनपर्यंत ही आग पोहचल्याने काही गाड्यांनी पेट घेतला आणि त्यामुळे काही गाड्यांचा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे कार्य सुरूच आहे. लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येणार असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
विदर्भाचे माजी रणजी खेळाडू आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्युरेटर हिंगणीकरांचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हळूहळू आगीने भीषण स्वरूप धारण करत आगीचे लोळ हे चार मळ्यापर्यंत उंचावले आणि ही आग जनरेटर रूमपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अग्निशमन दलासमोर आव्हान उभे राहिले होते. ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. आग वाढत चालली असताना नियंत्रणासाठी अग्निशमन दलाची कसरत सुरु आहे. लवकरच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त होणार असल्याचे यावेळी अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनांची माहिती पुढील प्रमाणे :

फायर वाहन : ०५,
रेस्क्यू वाहन : ०२,
वॉटर टँकर : ०५,
जम्बो वॉटर टँकर : ०२,
ब्रांनटो : ०१,
जीप : ०६,
बुलेट : ०१

मुंबईच्या ओशिवारा फर्निचर मार्केटमध्ये अग्नितांडव; सगळच भस्म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed