नवी दिल्ली :राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग भयंकर वेगाने वाढताना पाहायला मिळतोय. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये एक दिवसांमध्ये एक हजारहून अधिक रुग्ण समोर आलेत. इतकच नाहीतर सोमवारी महाराष्ट्रामध्ये करोनाचे ५०५ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मास्क घालण्याचे, नियमित्ताने हात धुण्याचे आणि कार्यालये नियमित स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत.दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये एका दिवसात १०१७ प्रकरण नोंदवली गेली. जिल्ह्यात रुग्णांचा पॉझिटिव्ह दर हा ३२.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तो गेल्या १५ महिन्यांचा हा उच्चांक आकडा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी १४ जानेवारीला दिल्लीत पॉझिटिव्ह दर ३०.६% नोंदवला गेला होता. तर सोमवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी रविवारी १६३४ प्रकरणं समोर आली होती. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी १३९६ रुग्ण समोर आली.
पृथ्वीचं टेन्शन वाढलं, प्रशांत महासागराच्या तळाला सापडलं भयंकर; शास्त्रज्ञही घाबरले…महाराष्ट्रात करोनाने पकडला वेग….
सोमवारी महाराष्ट्रात करोनाची ५०५ नवीन प्रकरणं समोर आली. मुंबईमध्ये २६२, पुण्यामध्ये ९०, औरंगाबादमध्ये ३९, नाशिकमध्ये १२, कोल्हापूरमध्ये ७ रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकार्याकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये करोनाचे सक्रिय रुग्ण ६०८७ वर पोहोचली आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ९६१६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ७२७६ सरकारी प्रयोग शाळांमध्ये आणि २१८५ खाजगी प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्येही करोनाचा धोका वाढतोय. यावर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून वारंवार देण्यात येत आहेत.
बापरे! या फोटोमागचं सत्य वाचून तुम्ही हादराल, आई-वडिल आणि मुलाचा VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल…
दरम्यान, कोविडच्या वाढत्या केसाच्या पार्श्वभूमीवर तज्ञांचे म्हणणे की, पुढचे काही दिवस महत्त्वाचे असणार आहेत. कारण, मध्यंतरामध्ये करोनाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्यानंतर या आकडेवारीमध्ये घट होईल. आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात पुन्हा एकदा साथीच्या आजारांचा फैलाव सुरू झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याने हा आकडा कमीच आहे.
सुरत आल्याचं समजून आजी शेगाव स्थानकातच उतरल्या, पुढे २ तासांत अशी खबर आली की सगळेच हसले…