• Sat. Sep 21st, 2024

फाट्यावर पान खाण्यासाठी गेले, पहाटे परतत असताना कारचा भीषण अपघात, आईने एकुलता एक लेक गमावला

फाट्यावर पान खाण्यासाठी गेले, पहाटे परतत असताना कारचा भीषण अपघात, आईने एकुलता एक लेक गमावला

सातारा :ग्रामदैवतांच्या यात्रेदरम्यान वारणानगर (ता. सातारा) हद्दीत कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात सिध्देश आनंदराव सावंत (वय ३५, रा. वेणेगाव, ता. सातारा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. सिध्देश हा एकुलता एक मुलगा असून घरातील कर्ता पुरुष होता. त्याच्या मृत्यूने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेणेगाव येथील यात्रा नुकतीच पार पडली. यात्रेनिमित्त शनिवारी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला होता. तो आटोपल्यानंतर खोडद फाट्यावर पान खाण्यासाठी वेणेगाव येथील निखिल सावंत, विशाल देशमुख, सुरज सावंत व सिध्देश सावंत या चौघा मित्रांनी जाण्याचे ठरवले.

आठवड्याभरात साताऱ्यातील आणखी एका जवानाला वीरमरण, कर्तव्यावर असताना घडली दुर्दैवी घटना
त्यानुसार सिध्देश सावंत यांच्या स्वीफ्ट कार (एमएच ५० ए ५४४६ ) मधून ते खोडद फाट्यावर गेले. तेथे पान खाणे झाल्यानंतर पहाटे घरी परत वेणेगाव गावी येत असताना अपघात घडला. यावेळी सिद्धेश हा गाडी चालवत होता. वारणानगर हद्दीत कारच्या झालेल्या अपघातात सिध्देश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर या गाडीत तिघेजण किरकोळ जखमी झाले. या अपघातात कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. सुदैवाने तिघेजण मित्र बचावले. सिध्देश यांचे नागठाणे येथे जेनरिक मेडिकल आहे.

सासऱ्यांची दुचाकी अडवून जावयाने तीन गोळ्या झाडल्या, नंतर स्वतःच पोलिसांसमोर हजर झाला
त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, पाच बहिणी असा मोठा परिवार आहे. सिध्देश हा एकुलता एक मुलगा असून कर्ता पुरुष होते. सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतची माहिती निखिल रामचंद्र सावंत (रा. वेणेगाव) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास अपघात विभागाचे पोलिस हवालदार प्रवीण शिंदे व प्रकाश वाघ करत आहेत.

आम्ही मेल्यावर सरकार जमिन देणार का? भाकरी-तुकडा घेऊन आजी आंदोलनात, धरणग्रस्तांचे मनोबल वाढवतेय ७५ वर्षीय वाघीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed