• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर

महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर

खारघर/रायगड:निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पाहण्यासाठी चार-पाच तास भर उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघाताने जीव गमवा. यापैकी आठ मृत व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. तर, २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २४ व्यक्तींना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.मृतांपैकी ८ मृतांची ओळख पटलेली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.१) श्रीमती वायचळ २) तुकाराम वांगडे ३) महेश गायकर ४) मंजुषा भाबंडे ५) स्वप्नील केणे ६) संगीता पवार ७) जयश्री पाटील ८) भीमा साळवी, अशी मृतांची नावे आहेत. उर्वरित ३ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारांचा सर्व खर्च सरकार करील.

मोठी बातमी : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात मृत्यूचे तांडव; उष्माघाताने घेतला ११ जणांचा बळी
बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी “हरवले व सापडले” समितीचे प्रमुख ७९७७३१४०३१ व तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास ०२२-२७५४२३९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण प्रदान
दरम्यान, रात्री उशिरा ११ मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. प्रत्येक मृतदेहासोबत एक माणूस व गाडी सरकारतर्फे देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचे नातेवाईक गावी घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

आशा भोसलेंना भाषण करताना फुलांमुळे अडचण; पाहताच क्षणी फडणवीसांनी पोडियमची सजावट उपसली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed