• Mon. Nov 25th, 2024
    बस १५० फूट खोल दरीत कोसळली, पोलीस कर्मचारी मागचापुढचा विचार न करता पहाटेच्या काळोखात दरीत उतरले

    खोपोली:पिंपरीतील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत ढोलताशा वाजवून मुंबईकडे परतत असलेल्या झांजपथकाच्या बसचा शनिवारी पहाटे बोरघाटात भीषण अपघात झाला. ही बस रस्त्याच्या कडेला असणारे रेलिंग तोडून थेट १५० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळच्या दरीत ही बस कोसळली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि बस खोल दरीत कोसळल्यामुळे याठिकाणी मदत पोहोचणे अवघड होते. मात्र, यावेळी मागचापुढचा विचार न करता खोपोलीतील तीन पोलीस कर्मचारी पहाटेच्या काळोखात खोल दरीत उतरले आणि त्यांनी जखमींना मदत करायला सुरुवात केली.

    खोपोलीतील कराडे, राठोड आणि खंदाडे हे तीन पोलीस शिपाई अपघाताची माहिती मिळताच सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. पहाटेची वेळ असल्यामुळे याठिकाणी अंधार होता. मात्र, या तिन्ही पोलीस शिपायांनी दरीत उतरायचे ठरवले. अवघ्या काही मिनिटांत झपझप खाली उतरत हे पोलीस शिपाई बस कोसळली होती, त्या ठिकाणापर्यंत पोहोचले. आम्ही खाली उतरलो तेव्हा बसमधील जखमी प्रवासी मदतीसाठी ओरडत होते. प्रत्येकजण आम्हाला दरीतून वर घेऊन चला, असे सांगत होता. आम्ही शक्य तितक्या लोकांना दरीतून वर न्यायचे, असा प्लॅन ठरवला. चारही बाजूंनी आमच्या कानावर ‘आम्हाला वाचवा’ हा एकच शब्द कानावर पडत होता. मग आम्ही तेथील परिस्थिती पाहिली, सर्वात पहिले गंभीर दुखापत झालेल्या लोकांना वर न्यायाचे असे ठरवले. काही लोकांची स्थिती चांगली होती, अशा १० जणांना आम्ही बाजुला बसवले. त्यानंतर आम्ही लोकांना दरीतून वर न्यायला सुरुवात केली. सुरुवातीला तर आम्ही काही जखमींना खांद्यावर घेऊन वर नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गावकरी, हायकर्स ग्रुपचे सदस्य याठिकाणी पोहोचले, अशी माहिती या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.

    दरीतून बाहेर काढल्यानंतर लहान मुलं तहानेने व्याकुळ, खूप गयावया करुनही ॲम्ब्युलन्समध्ये पाणी दिलं नाही कारण…

    जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातामधील मृतांची नावे

    जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई
    यश सुभाष यादव
    कुमारी वैभवी साबळे, वय १५ वर्ष
    स्वप्नील धुमाळ, वय १६ वर्ष
    सतिश धुमाळ, वय २५ वर्ष
    मनीष राठोड, वय २५ वर्ष
    कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई
    राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई

    बोरघाटात मृत्यूचं निमंत्रण! मुंबईला जाताना बसने अचानक लेफ्ट टर्न का घेतला? कारण आलं समोर

    अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे

    नम्रता रघुनाथ गावणूक, वय २९ वर्ष
    चंद्रकांत महादेव गुडेकर, वय २९ वर्ष गोरेगाव.
    तुषार चंद्रकांत गावडे, वय २२ वर्ष गोरेगाव.
    हर्ष अर्जुन फाळके, वय १९ वर्ष गोरेगाव.
    महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्ष गोरेगाव.
    लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय १६ वर्ष गोरेगाव.
    आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष दहिसर.
    सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष खालची खोपोली.
    यश अनंत सकपाळ, वय १९ वर्ष गोरेगाव.
    वृषभ रवींद्र थोरवे, वय १४ वर्ष गोरेगाव.
    शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव.
    जयेश तुकाराम नरळकर, वय २४ वर्ष कांदिवली.
    विशाल अशोक विश्वकर्मा, वय २३ वर्ष कांदिवली.
    रुचिका सुनील धूमणे, वय १७ वर्ष गोरेगाव.
    ओम मनीष कदम, वय १८ वर्ष गोरेगाव.
    युसूफ उनेर खान, वय १४ वर्ष गोरेगाव.
    अभिजित दत्तात्रय जोशी, वय २० वर्ष रत्नागिरी.
    कोमल बाळकृष्ण चिले, वय १५ वर्ष मुंबई.
    हर्ष वीरेंद्र दुरी, वय २० वर्ष कांदिवली.
    ओमकार जितेंद्र पवार, वय २४ वर्ष खोपोली, सोमजाई वाडी.
    दिपक विश्वकर्मा, वय २१ वर्ष कांदिवली.
    हर्षदा परदेशी
    मोहक दिलीप सालप, वय १८ वर्ष मुंबई

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *