याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी श्री केद्राई माता मंदिरात नवसपूर्तीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी आले होते. यावेळी तन्वी नीलेश देवकर आणि तिची आई अर्चना नीलेश देवकर यांनां देवीचे दर्शन घतले. त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आई लेकीला घेऊन धरणाजवळ गेली आणि इथेच दोघांच्या आयुष्याचा शेवटच झाला.
वानराच्या निधनाने गावाला अश्रू अनावर; श्रद्धांजलीसाठी गावात ११ दिवसाचा दुखावटा जाहीर!
धरण काठाजवळ आई अर्चना हीचा पाय घसरला आणि ज्या चिमुकलीसाठी नवस फेडण्यासाठी आले होते ती चिमुरडी तन्वी आणि आई अर्चना दोघीही पाण्यात पडल्या. यादरम्यान त्यांना वाचवण्यासाठी परिसरातील काही नागरिकांनी धाव घेतली परंतु ते म्हणतात ना मृत्यूच्या समोर कुणाचेही चालत नाही, त्याचाच प्रत्येय येथे पाहायला मिळाला. त्यांना वाचवता आलं नाही आणि आई-मुलीचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
जेव्हा सात महिन्याच्या चिमुकलीसह आई धरणाच्या पाण्यात पडली तेव्हा तिले आपल्या लेकीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, पोहता येत नसल्याने त्या दोघी माय लेकींचा करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेने देवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या मायलेकींच्या मृत्यूचं निमित्त नवस ठरला, अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडनेर भैरव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्यवाहीस सुरुवात केली. तसेच, स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.