• Sat. Sep 21st, 2024

३ राज्यांतील पेट्रोलपंप चालकांना भरली धडकी, इंधनचोरांच्या टोळीचा धुडगूस, अशी करत होते चोरी

३ राज्यांतील पेट्रोलपंप चालकांना भरली धडकी, इंधनचोरांच्या टोळीचा धुडगूस, अशी करत होते चोरी

सोलापूर:सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य संशयित डिझेल चोरट्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक व गुजरात राज्यातील पेट्रोल पंपावरील डिझेल टाक्या रिकाम्या करून धाराशिव,सोलापूर येथील महामार्गावर ट्रक चालकांना फक्त ७१ रुपये दराने प्रति लिटर डिझेल विक्री करत होते. पेट्रोल पंपावरील कर्मचारी झोपल्यानंतर पंपाच्या मुख्य टाकीमध्ये पाइप टाकून ते मोटारीच्या साहाय्याने ओढून डिझेल चोरी करत होते. सोलापूर तालुका पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १ हजार लिटर डिझेलसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रामा पाण्या पवार (वय ४५), लक्ष्मण पाण्या पवार (वय ४७), गणेश बाळू पवार (वय ३०), किरण अर्जुन काळे (वयं २०), सचिन छगन शिंदे (वय २३, सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, उस्मानाबाद), शंकर गजेंद्र पवार (वय ३४, रा. लक्ष्मीनगर, भूम), उद्धव बापू शिंदे (वय २३, रा. वाशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

चोरट्यांनी दुकानात मोठा डल्ला मारला, मात्र एक चूक केली, पूर्ण टोळीच आली पोलिसांच्या जाळ्यात
खबऱ्यामार्फत बिंग फुटले

सुमित शरणप्पा चिलोबा (वय ३२, रा. महर्षी नगर, शेळगी) यांच्या काकाच्या मालकीचे बोरामणी, तालुका दक्षिण सोलापुरातील पेट्रोल पंपाच्या डिझेलच्या टाकीतून ४ लाख ६३ हजारांचे पाच हजार लिटर डिझेल चौरल्याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करताना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा तेरखेडा, जि. धाराशिव(उस्मानाबाद)येथील ७ संशयित इसमानी केली असल्याची माहिती खबऱ्याने दिली.बातमीदाराने परफेक्ट माहिती दिल्याने पोलिसांनी संशयित आरोपीना कर्नाटक राज्यातील बसवकल्याण जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. हे सातही संशयित आरोपी कर्नाटक मध्ये डिझेल चोरीसाठी गेले होते. सोलापूर पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील चोरी थांबली.

तपासी अमलदारांनी अगोदर रेकी केली अन मग ताब्यात घेतले

पीएसआय सुरज निंबाळकर यांनी माहिती देताना सांगितले,उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील एक आंतरराज्य टोळी डिझेल चोरी मध्ये सक्रिय असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराने दिली. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र या तीन राज्यातील पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तपासी अमलदार पीएसआय सूरज निंबाळकर हे आपल्या टीमसह टोळीचा शोध सुरू केला. कर्नाटकमधील बसव कल्याण जिल्ह्यात ही टोळी एका गॅरेजवर ट्रक रिपेअर करत थांबली आहे. सोलापूर पोलिसांच्या पाच जणांची टीम ताबडतोब बसवकल्याण पोहोचली. सात जणांना ताब्यात कसे घ्यायचे असा प्रश्न पडला होता.सोलापूर पोलिसांनी अगोदर रेकी केली आणि ताब्यात घेतले.

कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं: महाडिक-पाटील वाद शिगेला, दोघेही बिंदू चौकात आले मात्र…
कर्नाटक ट्राफिक पोलिसांच्या मदतीने सातही संशयित ताब्यात

सोलापूर पोलिसांनी कर्नाटक राज्यातील टवाहतूक पोलिसांची मदत घेतली.कर्नाटक वाहतूक पोलिसांनी गॅरेज मध्ये असलेल्या सर्व वाहनांची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली.त्यावेळी हे सात ही संशयित कर्नाटक वाहतूक पोलिसाना समजूत घालण्यासाठी एकत्र आले.त्यावेळी सोलापूर पोलिसांनी ताबडतोब घेराव घालून सातही संशयितांना ताब्यात घेतले ,पोलीस व्हॅन मध्ये घालून थेट सोलापूर पोलिस स्टेशनला आणले.अधिक विश्वासात घेऊन खरी माहिती व केलेल्या गुन्ह्याची माहिती समोर आणली

असे करत होते डिझेल चोरी

पेट्रोलपंप लुटणाऱ्या टोळीचा प्रमुख हा संशयित रामा पाण्या पवार आहे.रामा पवार हा सुरुवातीला हायवेवरील पेट्रोल पंपची रेखी करत होता.पेट्रोल पंपा शेजारी मोकळी जागा असलेले पेट्रोलपंप निवड करत होता.मध्य रात्री ट्रक घेऊन छोटेछोटे ३५ लिटरचे कॅन घेऊन २०० फुटांवरून पंपाच्या डिझेल टाक्यात पाईप घालून डिझेल चोरी करत होते.यासाठी एक एचपीची मोटार वापरत होते. पंपावरील डिझेल टाकीत जेवढे डिझेल आहे, सर्व कॅनमध्ये भरून ट्रक मध्ये ठेवून घेऊन जात होते.

शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार ‘वरात’ मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
तेरखेडा (धाराशिव) येथील महामार्गावर ट्रक चालकांना फक्त ७१ रुपयांना प्रति लिटर विक्री करत होते. ही सर्व अधिकृत माहिती तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांनी व पीएसआय सुरज निंबाळकर यांनी सांगितली. सोलापूर तालुका, पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरणातील पोह संजय देवकर, पोना शशिकांत कोळेकर,सह आदींनी या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed