• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

    शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी

    सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच लाख रुपये ठेवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘वरात’ मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाबाबत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करायला कोणतीच मुलगी तयार होत नाही, हा प्रकार वाढत चालला आहे. यामुळे चाळीशी ओलांडून गेलेल्या मुलांची लग्न होत नसल्याने त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता आणि मानसिक आजार निर्माण होत आहेत. शेतकरयांच्या मुलांची लग्न एक सामाजिक समस्या बनत चाललेली आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने आता शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर दहा लाख रुपयांची ठेव,त्याचबरोबर मुलीच्या वडिलांच्या नावे पाच लाख रुपयांची ठेव ठेवावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.

    कॉलेजकडे जाऊ असे सांगत युवकाला गाडीत बसवले, पुढे घडला धक्कादायक प्रकार
    सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच थेट ‘वरात’ मोर्चा

    ही मागणी घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच थेट “वरात” मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. तसेच लग्न न झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या या “वरात”मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन देखील महेश खराडे यांनी केले आहे.

    पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने केले धक्कादायक कृत्य
    देशात आणि राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेl. शेतीतील उत्पादन अत्यल्प बनले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मुलावर बरोबर लग्न लावून घ्यायला तयार नाही. शिवाय कोणतीही मुलगी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार होत नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

    नागपूर हादरले! १२ वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागले, आईने डॉक्टरांकडे नेले, तपासणी करताच बसला धक्का
    या परिस्थितीला सरकार जवाबदार असल्याने राज्य सरकारनेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या बाबतीत आता ठोस पावलं उचलली पाहिजेत,आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या बरोबर लग्न करणाऱ्या मुलींच्या आणि त्यांच्या वडिलांच्या नावे दहा आणि पाच लाख रुपये ठेवी ठेवल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी देखील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed