मुंबई :मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत. उपहारगृहात लावलेल्या फोटोवर हा भांडे चोरीचा प्रकार समोर आला आहे. भांडे कोणी चोरले? असा प्रश्न सर्वांना पडला असून हा चर्चेचा विषय बनला आहे.पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात पण खाल्ल्यानंतर ही भांडी उपहार गृहाला परत करतच नाहीत. उपहारगृहाच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचे सांगितले जाते. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले आहेत. भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे.
पालिकेतील काही कर्मचारी अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात. ती परत केली जात नाहीत, असा आरोप आहे. अशा प्रकारालामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली आहेत. ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

भांडी गायब झाल्यामुळे आतचा थेट उपहारगृहाच्या समोरच्या बाजूलाच भांडी घेऊन जाऊ नका, अशी सूचना लिहिण्याची वेळ चालकावर आली आहे. उपहारगृहातील हा फोटो व्हायरलही झाला आहे.
उपहारगृहातून भांडी घेऊन जाऊ नका उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाल्याने यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका, असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. तशी विनंती करणारा फलक उपहारगृहामध्ये लावण्यात आला आहे.
कोणती भांडी हरवली?
चमचे – ६ ते ७ हजार
लंच प्लेट – १५० ते २००
नाश्ता प्लेट – ३०० ते ४००
ग्लास – १०० ते १५०