• Sat. Sep 21st, 2024

पंकजा मुंडेंच्या ज्या कारखान्यावर GSTने छापा टाकला तो वैद्यनाथ कारखाना गोपिनाथ मुंडेंनी कसा उभारला होता?

पंकजा मुंडेंच्या ज्या कारखान्यावर GSTने छापा टाकला तो वैद्यनाथ कारखाना गोपिनाथ मुंडेंनी कसा उभारला होता?

बीड :ऊसतोड कामगाराच्या एका मुलाने १ नोव्हेंबर १९९९ ला सहकारी साखर कारखाना सुरू केला. साखर सम्राटांनाही शह देण्यासाठीचं हे पहिलं पाऊल होतं. गोपीनाथ मुंडे राजकारणात पवारांना नडले, शिवाय सहकार क्षेत्रातही ताकद निर्माण करण्यासाठी त्यांनी कारखान्यांचंही जाळं तयार केलं. त्यापैकीच एक कारखाना म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना…परळीतल्या या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने छापा टाकला आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला हा कारखाना पुन्हा चर्चेत आला. एकट्या वैद्यनाथ कारखान्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांनाही टक्कर दिली आणि या कारखान्याचा मराठवाड्याला मोठा फायदा झाला.

गोपीनाथ मुंडेंनी साखर कारखान्यासाठी हालचाली सुरू केल्या. पण काँग्रेस सरकार काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारखाना उभारणीस परवानगी मिळाची नाही, असं बोललं जातं. पण केंद्रात वाजपेयी सरकार येताच गोपीनाथ मुंडेंच्या कारखान्याचा मार्ग मोकळा झाला. वाजपेयी सरकारच्या १३ महिन्यांच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडेंनी कारखान्याला मंजुरी मिळवली. कारखाना परवान्यासाठी प्रमोद महाजनांनी दिल्लीत ताकद लावली आणि युती सरकारच्या माध्यमातून झोन बंदीचा निर्णय हटवत शेतकऱ्यांना कुठल्याही कारखान्यावर ऊस नेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. १ नोव्हेंबर १९९९ ला कारखान्याच्या पहिला गाळप हंगाम सुरू झाला.

शेतकऱ्यांशी बोलताना रेंजमध्ये राहण्यासाठी धडपड; सुरक्षारक्षकाने हटकताच प्रीतम मुंडेंच्या संतापाचा पारा चढला
ऊसतोड मजुरांचा मुलगा ते यशस्वी कारखानदार असा स्थित्यंतराचा टप्पा ओलांडण्याची संधी गोपीनाथ मुंडेंना वैद्यनाथ कारखान्याने दिली. त्यातच कारखान्याची कामगिरी लक्षवेधी ठरल्याने यशस्वी कारखानदार म्हणून मुंडे नावारूपाला आले. १९९९ ला वैद्यनाथ कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार टनांची असताना साडेतीन हजार टनाच्या गाळपाचा विक्रम केला. एकाच दिवशी साडे पाच हजार पोती साखर उत्पादन करण्याचाही विक्रम केला.

पहिल्याच गाळपात ऊसाला ८०० रुपये प्रति टन भाव देण्यात आला. गळीत हंगामात ११.८१ टक्के ऊसाचं गाळप करून आशिया खंडातील विक्रमी गाळप केल्याची नोंद या कारखान्याने केली. बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतून आलेल्या लाखो टन ऊसाचं गाळप झालं. विक्रमी गाळपाने मराठवाड्यातल्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मिटला. ४७५ रुपयांत एका साखरेच्या पोत्याचं उत्पादन करून खर्चात बचत आणि शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळाला.

महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर १९९९ पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र गोपीनाथ मुंडेही कारखानदारीत उतरले आणि सहकारात पॉवरफुल झाले. मुंडेंना सहकारात मजबूती दिली ती वैद्यनाथ कारखान्याच्या यशाने. वैद्यनाथ कारखाना नव्हता तेव्हा अंबाजोगाई, रेणापूर, अहमदपूर, केज, गंगाखेड, वडवणी या भागातील उस बांधावर फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर यायाची. पण वैद्यनाथ कारखान्यामुळे अतिरिक्त उसावर कायमचा तोडगा निघाला.

स्वप्न होतं गायक होण्याचं पण परिस्थितीमुळे बनला गोळेवाला; तरुणानं हार मानली नाही, महिन्याला भरघोस कमाई

वैद्यनाथ कारखान्याची वाटचाल लक्षवेधी ठरल्याने सहकारात बोलबाला असलेल्या अनेक नेत्यांनी ‘मुंडे पॅटर्न’ची दखल घेतली. प्रचंड तोटा सहन करूनही पुढे पंकजा मुंडेंनी हा कारखाना चालवला. पण एकेकाळी गोपीनाथ मुंडेंची ताकद वाढवणारा हा कारखाना सध्या बंद पडलाय. त्यातच जीएसटी विभागाने कारखान्यावर कारवाई केल्याने हा कारखाना पुन्हा चर्चेत आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed