डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत राहत होती. जून २०२० मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. याच दरम्यान पीडित महिलेचे पतीने अश्लील व्हिडिओ काढले व हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. याचा जाब विचारला असता पीडित महिलेला पतीने मारहाण केली. आपला पती भिवंडीतील एका तरुणीशी दुसरे लग्न करणार असल्याची माहिती पीडित महिलेला मिळाली. या संदर्भात विचारणा केली असता पतीसह त्याच्या कुटुंबाने पीडित महिलेला शिवीगाळ करत धमकावले. या प्रकरणी पीडीत महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीसह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
असा वाढला कौटुंबिक हिंसाचार
पिडीत विवाहितेने या संदर्भात सविस्तर माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे जबाब नोंदवून पोलिसांनी आरोपी पती महेश पाटील (वय २७) सह अन्य पाचजणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आरोपी महेश याचे यापूर्वी लग्न झाले आहे. पहिल्या पत्नीशी फारकत घेतल्यानंतर त्याने आपल्याशी लग्न केले. एके रात्री त्याने त्याच्या मोबाईलमध्ये समागमाचा व्हिडिओ शुट केला. हा व्हिडिओ त्याने १० मार्च रोजी व्हायरल केला. या व्हिडिओखाली समाजात बदनामी होईल असा मजकूरही टाकला. जाब विचारला असता आपणास मारहाणही करण्यात आली. पोलिसात तक्रार दिल्यास परिणाम वाईट होतील, अशीही आपणास धमकी दिल्याचे पिडीत महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
आपल्याशी लग्न झालेले असतानाही भिवंडीतील एका तरुणीशी गुपचुप साखरपुडा करून लग्नाची तारीख ठरवली. याबाबत सासऱ्यांना जाब विचारला असता त्यांनीही आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ६ एप्रिल रोजी मैत्रिणीसह घरी असताना पतीचे नातेवाईक आले. त्यांनीदेखील आपणास शिवीगाळ केली. तसेच ‘तू जर महेशला सोडले नाही आणि त्याच्या लग्नात आडवी आलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही. तुझे आई, वडील, भाऊ, बहिणीसह सर्व नातेवाईकांना संपवून टाकू’, अशी धमकी दिल्याचे पिडीत महिलेने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
150 प्रकारचे डोसे एकाच ठिकाणी, दिल्लीतील राजा राणी डोसा नक्की आहे तरी काय ?