यावेळी प्रल्हाद राजाराम गुरव, पुनम प्रल्हाद गुरव व राजेश प्रल्हाद गुरव या तिघांना मारहाण करत त्यांना बांधून ठेवले. तर तिघांच्या तोंडाला बांधल्यामुळे त्यांना आरडाओरडाही करता येत नव्हते. शिवाय गावापासून दूर शेतात घर असल्याने घडलेल्या घटनेची माहिती कोणालाच माहीत नसल्याने याचा फायदा घेत चोरट्यांनी २२० पाळीव डुकरे, २०० किलो काजूगर, सोने चांदी व दोन मोबाईल यासह अन्य घरगुती अंदाजे ९ लाख १७ हजाराचा ऐवज लंपास केला.
माजी सरपंच प्रल्हाद गुरव हे आपल्या परिवारासोबत शेतात राहत होते. त्यांचा काजू प्रक्रिया युनिट व वराह पालनाचा व्यवसाय होता. यासाठी घरात पाळीव डुक्कर यासह काजू प्रक्रियेसाठी लागणारे मशीन होते. हे सर्व दरोड्यांनी चोरून नेले. दरम्यान हा सर्व प्रकार तब्बल तासभर सुरू होता. तर काही वेळाने जवळच राहणाऱ्या गावकऱ्यांना शंका आल्याने त्यांनी घरात गेले असता कुटुंबांना दोरीने बांधून ठेवले असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान शेजाऱ्यांनी त्यांना सोडवले.
गुरव यांनी घडलेली घटना सांगितली. या घटनेची माहिती पोलिसांना देताच गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे हे श्वान पथकासह घटनास्थळी दाखल होत तपासणी सुरू केली. तर श्वानाला वासाच्या आधारे पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळले. यामुळे तत्काळ श्वान पथक चोराचा तपासाठी रवाना करण्यात आले आहे. हे दरोडेखोर कर्नाटकमधील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर घटनेतील जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.