• Sat. Sep 21st, 2024

घरगुती वादातून शेजाऱ्याचा डोळा फोडला, आता डॉक्टरला द्यावे लागणार सहा लाख, कोर्टाचा निर्णय काय?

घरगुती वादातून शेजाऱ्याचा डोळा फोडला, आता डॉक्टरला द्यावे लागणार सहा लाख, कोर्टाचा निर्णय काय?

नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी आरोपी डॉक्टरला दिलेल्या आदेशानुसार डोळा फोडलेल्या व्यक्तीला ६ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे.डॉ. श्यामराव दौलतराव पाटील असे आरोपीचे नाव असून तो शेलू बाजार येथील रहिवासी आहे. न्यायालयाने आरोपीला नुकसान भरपाई देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीला एक वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच, आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरोपीने तुरुंगवास भोगल्यानंतरही, पीडितेला उपलब्ध कायदेशीर मार्गाने भरपाई वसूल करता येईल.

कोट्यवधी रुपयांची भरपाई देऊनही पीडितेची दृष्टी परत येणार नाही. मात्र, सहा लाख रुपयांच्या भरपाईमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल, असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. हिंमतराव सखाराम जाधव असे पीडितेचे नाव आहे. दिवाणी न्यायालयाने जाधव यांना २ लाख ५० हजार रुपयांची भरपाईही दिली आहे.

मोठी बातमी! पंजाबमधील भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये अंधाधुंद गोळीबार, चार जवानांचा मृत्यू
पाटील यांच्या घरातील घाण पाणी नेहमी रस्त्यावर वाहत असे. याबाबत विचारणा केल्यावर १३ एप्रिल २००४ रोजी पाटील व त्यांची पत्नी विजया यांनी जाधव व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. याचदरम्यान पाटील यांनी दगडफेक करून जाधव यांचा डावा डोळाही फोडल्याची तक्रार प्राप्त झाली. १६ मार्च २००९ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाटील यांना दोन वर्षांचा कारावास आणि १००० रुपये दंड, तर विजया हिला सहा महिने कारावास आणि १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आदल्या दिवशी कुटुंबियांनी रोखले, पण दुसऱ्या दिवशी तरुणाने तेच केले, शेवटी नको ती बातमी आलीच
त्यानंतर, ३ ऑगस्ट २०१३ रोजी सत्र न्यायालयाने पाटील यांची शिक्षा कायम ठेवली. परंतु विजया यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे पाटील यांनी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर जाधव यांनी विजया यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा सुधारित निकाल देऊन त्या याचिका निकाली काढल्या.

मी ३ लाख घेते असं कोणी सांगितलं?; इंदुरीकर महाराजांच्या आरोपावर पहिल्यांदाच बोलली गौतमी पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed