• Sat. Sep 21st, 2024
पुढच्या वर्षी निवृत्ती होती, सुरेश बांगर बंदोबस्ताला निघालेले, कारच्या धडकेत सारं संपलं

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे. या अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी उलट वाढ होत चालली आहे.प्रत्येक दिवसाला एखाद्या व्यक्तीला आपला अपघातामध्ये जीव गमवावा लागत आहे.घराच्या बाहेर निघाल्यानंतर आपण काम आटोपून घरी पोहोचतो की नाही याची भीती मनामध्ये वाहनधारक बाळगत आहेत.जनतेची सेवा करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा आज हिंगोलीत अपघाती मृत्यू झाला आहे. हिंगोली येथील बैठक आटोपून कळमनुरी येथे मिरवणूक बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलीस जमादाराच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस जमादाराचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सुरेश बळीराम बांगर (५७) असे जमादाराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,कळमनुरी पोलीस ठाण्यांतर्गत तालुका विशेष शाखेत कार्यरत असलेले सुरेश बळीराम बांगर हे आज सकाळी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने आले होते.दुपारी बैठक आटोपून ते दुचाकी वाहनावर कळमनुरीकडे निघाले होते.त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा शिवारात आले असताना भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बांगर जागीच कोसळले.

कर्नाटकच्या रणधुमाळीत भाजपच्या माजी उपमख्युमंत्र्यांचं नड्डांना पत्र, निवडणुकीबाबत मोठा निर्णय कळवला

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरीक तसेच कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वैजनाथ मुंडे, जमादार गजानन होळकर,प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी बांगर यांना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.

भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, दोघे गाडीसह पुलावरुन खाली कोसळले, रुग्णालयात नेलं पण नको तेचं घडलं
दरम्यान,जमादार सुरेश बांगर हे पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार होते.हिंगोली जिल्हा पोलीस दलात त्यांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावले आहे. गंभीर गुन्हयांची उकल करणे, फरारी आरोपींची माहिती काढणे, जिल्हयातील गोपनीय माहिती घेऊन आरोपींना अटक करण्यात त्यांचा हातखंडा होता.मागील काही दिवसांपासून ते कळमनुरी तालुका विशेष शाखेत कार्यरत होते.त्यांच्या पश्‍चात आई,पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

रोहितने डोक्यावरच हात मारला, नो बॉल-फ्रि हीट नसताना मुंबईने एकाच चेंडूत दिल्या ११ धावा

हिंगोलीतल्या पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा अंनिसकडून पर्दाफाश, थेट डेमो दाखवून उघडं पाडलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed