• Mon. Nov 25th, 2024

    बीअर घेण्यासाठी आला, दुकान मालकाचा ७० हजारांचा मोबाइल घेऊन पळाला; डोंबिवलीतील घटना

    बीअर घेण्यासाठी आला, दुकान मालकाचा ७० हजारांचा मोबाइल घेऊन पळाला; डोंबिवलीतील घटना

    डोंबिवली : ठाकुर्ली चोळेगाव परिसरात असलेल्या एका बिअर शॉपमध्ये बिअर घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याने दुकान मालकाचा ७० हजाराचा मोबाइल चोरून पळ काढल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका तासात ठाकुर्ली परिसरात चोरट्याचा पाठलाग करत त्याला अटक केली आहे. विवेक कुमार श्याम बिहारी श्रीवास्तव (वय २२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिरस्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे डोंबिवलीत सध्या सायकल चोरीचे प्रमाण वाढले असून पोलीस अशा चोरीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येतं आहे.ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारे पदमाकर चौधरी (वय ४८) यांचे लव कुश बिअर शॉप आहे. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास त्यांच्या दुकानात विवेक कुमार हा बिअर घेण्याच्या बहाण्याने आला होता. त्याने पद्माकर यांची नजर चुकवत काउंटरवर असलेला त्यांचा ७० हजार रुपये किंमतीचा मोबाइल चोरून तेथून पळ काढला. बिअर न घेता ग्राहक परत गेल्याने तसेच काउंटरवर मोबाइल नसल्याची बाब लक्षात येताच पद्माकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश सानप, नितीन सांगळे यांच्या पथकाने पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोबाइलचा आणि आरोपीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत चोरट्याचा शोध सुरू केला. एका तासाच पोलिसांनी चोरट्याचा ठाकुर्ली परिसरात शोध घेत त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरी केलेला ७० हजार रुपये किंमतीचा मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    पोलिसांना पिटाळून लावण्यासाठी तीन महिलांचं धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये घडली घटना
    डोंबिवलीत सायकल चोरी वाढली

    डोंबिवलीत सध्या सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलीस अशा चोरीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यापासून डोंबिवली शहरात सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सीसीटीव्हीत चोर कैद होत आहेत, मात्र त्या चोरांना पकडण्यात अपयश आले आहे.

    कल्याण-डोंबिवलीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना ठोकल्या बेड्या
    दरम्यान एकीकडे बिअर शॉपीमधील चोरी उघडकीस आणत पोलीस प्रेस नोट काढत आहेत. मात्र सायकल चोर कधी पकडणार आणि सायकल आम्हला परत मिळणार की नाही? असे सवाल आता नागरिक करू लागले आहेत. आतातरी पोलीस सायकल चोरीकडे आता गांभीर्याने लक्ष देतात का हे पहावे लागेल.

    बागेश्वर बाबाविरोधात जितेंद्र आव्हाडांचं अनोखं आंदोलन; प्रतिशिर्डीला जाऊन साईबाबांची आरती केली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed