• Mon. Nov 25th, 2024

    घरातील नकारात्मकता पळवतो, सुख-शांती आणतो; भिवंडीतील महिलेला मांत्रिकांकडून ५० हजारांचा गंडा

    घरातील नकारात्मकता पळवतो, सुख-शांती आणतो; भिवंडीतील महिलेला मांत्रिकांकडून ५० हजारांचा गंडा

    भिवंडी: ऋषी असल्याचे भासवून घरात तंत्रमंत्र आणि पूजेच्या करण्याच्या नावाखाली भोंदू मांत्रिकांनी महिलेच्या घरातून नकारात्मक ऊर्जा पळवून नेण्याच्या नावाखाली महिलेला तीन भोंदू मांत्रिकांनी ५० हजाराचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडीतील कशेळी भागातील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी भामट्या त्रिकुट भोंदू मांत्रिकांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.छोटे लाल यादव, लालू यादव, हिरालाल यादव असे फरार झालेल्या भोंदू मांत्रिकांची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील कशेळी गावात असलेल्या सीजी पार्कच्या राजलक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये ललिता हरिकेश उपाध्याय (४८) नावाची महिला राहते. गेल्या काही दिवसांपासून या घरात काहीतरी विचित्र घडत आहे, असा ललिताचा असा समज झाला होता. याचाच फायदा घेऊन त्या महिलेला उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील रहिवासी असलेले भोंदू मांत्रिक छोटे लाल यादव, लालू यादव, हिरालाल यादव नावाच्या तिघांनी मिळून आधी ललिता यांना जादूटोणा तंत्रमंत्र विद्या करत असल्याची थाप मारून त्यांना विश्वासात घेतले.

    मुलगा सतत आजारी, तांत्रिक म्हणाला बळी दे, मग १० वर्षांच्या भावासोबत जे घडलं ते हादरवणारं

    घरात सुख आणि शांती येण्यासाठी पूजाअर्चा

    त्यानंतर तिघांही भोंदूंनी त्या महिलेला सांगितले की, तुमच्या घरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे. आम्ही सर्व ऋषी आणि मांत्रिक असल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सुख आणि शांती आणू. यासाठी पूजापाठ करण्याची गरज आहे. पण यासाठी पूजा तुमच्या घरीच करावी लागेल. त्यात भरपूर पूजेचे साहित्य लागेल. असे सांगून तिघांनी आपसात संगनमत करून महिलेकडून ५० हजार उकळले. मात्र, ५० हजार रुपये घेऊन गेल्यानंतर तिन्ही भोंदू मांत्रिक घरात पूजापाठ करण्यासाठी आले नाही.

    मुंबईत IIT विद्यार्थ्याला ‘तांत्रिक सेक्स’साठी केले सेक्स गुलाम; हायप्रोफाइल प्रकरणात धक्कादायक आरोप

    फरार भोंदू मांत्रिक आरोपींचा शोध सुरू

    दुसरीकडे बरेच दिवस उलटूनही जेव्हा तिघेजण पूजापाठ करण्यासाठी घरी आले नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच ललिता हरिकेश उपाध्याय यांनी नारपोली पोलीस ठाणे गाठून तिन्ही भामट्यां मांत्रिकाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा आधारे पोलीसांनी तिन्ही फरार भोंदू मांत्रिक आरोपींचा शोध सुरू केला आहे.

    धीरेंद्र शास्त्रींवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे, तृप्ती देसाईंची मागणी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed