• Sat. Sep 21st, 2024
नॉट रिचेबलच्या चर्चांनी वाईट वाटलं, त्या त्रासामुळे झोपून होतो, अजित पवारांचं स्पष्टीकरण

पुणे : पित्ताचा त्रास झाल्याने कालचे सर्व दौरे रद्द केले, असं स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांवर दिलं. कारण नसताना बदनामी न करण्याचंही आवाहन अजितदादांनी सर्वांना केलं. अजित पवार शुक्रवारी रात्री अचानक ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अजितदादांचं पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या शोरुमच्या उद्घाटनाला सपत्नीक दर्शन झालं.कालपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेले अजित पवार आज सकाळी पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला पोहोचले. काल दुपारी बारामती होस्टेल येथे नियोजित बैठका उरकल्यानंतर अजित पवार फुरसुंगी येथे एका कार्यक्रमाला रवाना झाले होते. मात्र कार्यक्रमाला न जाता हडपसर इथूनच त्यांनी यूटर्न घेऊन सगळे दौरे रद्द केल्याची चर्चा माध्यमांत पसरली होती. त्यासोबत पुढील दोन दिवसांचे त्यांचे सर्व दौरेही रद्द करण्यात आले होते. मात्र आज सकाळी नियोजित कार्यक्रमानुसार रांका ज्वेलर्सचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला.

मोठी बातमी! अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये १ टक्के आरक्षण, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
जागरणं, दौरे जास्त झाली की मला पित्ताचा त्रास व्हायला लागतो. हे आजचं नाही तर नेहमीचं आहे. मला कसंतरी व्हायला लागलं, त्यामुळे मी जिजाईवर जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या आणून घेतल्या आणि शांतपणे झोपलो. सकाळपासून मी कार्यक्रमांना सुरुवात केली. मला इतकं वाईट वाटत होतं. अजित पवार नॉट रिचेबल वगैरे काही पण दाखवत होते. तुम्ही आधी खात्री करुन घ्या, कारण नसताना एखाद्याची किती बदनामी करायची, आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला अधिकार आहे, पण शेवटी आम्ही माणूसच आहोत, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखाद्या विषयावर भूमिका मांडली की त्यावर आम्ही कोणी काही बोलू शकत नाही. तीच पक्षाची भूमिका असते. त्यामुळे गौतम अदानी जेपीसी चौकशी प्रकरणावर त्यांची भूमिका अंतिम असेल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

अदानी प्रकरणात JPC चौकशीला विरोध नाही, पण… शरद पवारांची जाहीर भूमिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed