• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, १ ठार तर १२ जखमी

    मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, १ ठार तर १२ जखमी

    नाशिक : जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज (शुक्रवार) पुन्हा नाशिक मुंबई महामार्गावर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि लक्झरी बस मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत १ ठार तर जवळपास १० ते १२ जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही बस मुंबईहून शिर्डीला दर्शनाशाठी चाललेल्या भाविकांची होती या बसचा ६.३० वाजेच्या सुमारास महामार्गावर असलेल्या बोरटेंभे येथे अपघात झाला. या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर आज पहाटे ६.३० वाजेच्या सुमारास बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक MH 04 FJ 3803 ला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्सरी बस क्रमांक MH 48 K 3718 ने जोरदार धडक दिली यात एक जण ठार झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घोटी टोलच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    IPLची नवी टीम; गुजरात, मुंबई आणि चेन्नईची दाणादाण उडेल, पाहा कोण आहेत ते ११ खेळाडू

    दरम्यान, नाशिक मुंबई महामार्गावर बोरटेंभे येथील पोद्दार शाळेसमोर एक ट्रक नादुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता. खबरदारी म्हणून ट्रकच्या आजूबाजूला सेफ्टी कोन लावण्यात आले होते. यादरम्यान मुंबईहून शिर्डी कडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची ज्वेल फिश ट्रॅव्हल्स खाजगी कंपनीची बस असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. बस चालकाला पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली, यावेळी ना दुरुस्त ट्रकचा चालक मेहमूद शेख हा ट्रकच्या मागे काम करत होता. ट्रकला जोरदार धडक बसल्याने चालक जागीच ठार झाला. तर बसचा चालक महेंद्र पाल हा गंभीर जखमी झाला असून मधील आणखी काही १० ते ११ जण जखमी झाले आहेत.

    करोना रुग्णसंख्येत भर, खबरदारी म्हणून मास्क लावण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

    पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला असून अपघातातील जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काही रुग्णांना इगतपुरी तालुक्यातीलच विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनासाठी शिर्डी येथे जात असताना रस्त्यातच दुर्दैवी प्रसंग घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed