पुणे : पुरंदर तालुक्यातून एका घटना समोर आली आहे. एका दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एस टी बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढीगाऱ्यावर जाऊन पलटी झाली. या घटनेत एसटीची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झेंडे वाडी आरटीओ कॉर्नर जवळ ही दुर्घटना घडली आहे. बसमध्ये एकूण २९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. पुणे – पंढरपूर पालखी मार्गाचे काम सुरू आहे,त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे पुण्यातकदून सासवडच्या दिशेने एसटी महामंडळाची बस येत होती. त्यात एसटी आणि दुचाकीस्वाराची धडक झाली. मात्र बस चालकाने दुचाकी स्वराला वाचविण्याच्या नादात एसटी दुसऱ्या बाजुला नेल्याने एसटी बस उलटली.
धक्कादायक! पती-पत्नीचा घरगुती वाद टोकाला; पतीने रागाच्या भरात पत्नीचा कानच उपटून काढलाएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठारया बसमध्ये २९ प्रवाशी प्रवास करत होते. बसचा वेग कमी असल्याने कोणत्याही प्रवाशाला मोठी दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. एसटी मातीच्या भरवावावर पलटी झाल्याने कुठल्याही प्रवाशाला काही झाले नाही. मात्र दुचाकीस्वाराला एसटीची धडक बसल्याने त्याचा जागेवर मृत्यू झाला.
फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; डोंबिवलीत पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये तुफान राडा
या बरोबरच या अपघातात दुचाकीवर असणारी दुसरी व्यक्ती यात गंभीर जखमी झाली असून तिला पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.
पुरंदर तालुक्यातील तीन तरुणांचा अपघातात नुकताच मृत्यू झाला आहे. ती घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याचे काम चालू असल्याने वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
RR vs-PBKS : हेटमायर, जुरेलचे प्रयत्न वाया, नॅथन एलिसच्या झंझावाती गोलंदाजीने पंजाबचा राजस्थानवर थरारक विजय