• Tue. Mar 10th, 2026

    फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये राडा

    फूड डिलिव्हरी कंपनी की गुंडांची गँग?; पार्सलच्या पैशावरुन ग्राहक व डिलिव्हरी बॉयमध्ये राडा

    डोंबिवली : डोंबिवलीमधील लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने एका फूड डिलिव्हरी कंपनीकडून एक हजार रुपयाचे पनीर व इतर खाण्याच्या वस्तू आपल्या घरी पार्सल मागवले होते. त्यानुसार डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा यांचे पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. मात्र इमारतीत पोहोचल्यानंतर पार्सलचे पैसे देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉय मध्ये वाद सुरू झाला. या दरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ व इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर दुकानांमधील कर्मचारी व इतर डिलिव्हरी बॉय व ग्राहक सुनील मिश्रा यांच्यामध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर थोड्या वेळात दोन्ही गटात फ्रीस्टाइनने हाणामारी सुरू झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असेल. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला. दोन्ही गटाला पोलिसांनी कायदेशीर नोटीस बजावत दोघांवर कारवाई सुरू केली आहे.

    RR vs-PBKS : हेटमायर, जुरेलचे प्रयत्न वाया, नॅथन एलिसच्या झंझावाती गोलंदाजीने पंजाबचा राजस्थानवर थरारक विजय
    पार्सलचे पैसे देण्यास ग्राहक तयार नव्हता

    डोंबिवली लोढा हेवन परिसरात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या सुनील मिश्रा नामक व्यक्तीने या फूड डिलिव्हरी कंपनीकडून फूड पार्सल मागवले होते. एक हजार रुपयाचे पनीर आणि इतर खाण्याच्या वस्तू पार्सल मागवले होते. त्यानुसार डिलिव्हरी बॉय सुनील मिश्रा यांचे पार्सल घेऊन त्यांच्या इमारतीत पोहोचला. मात्र इमारतीत पोहोचल्यानंतर पार्सलचे पस देण्यास मिश्रा तयार नव्हता.

    भावाशी भांडण झाले, मुलीने गिळला मोबाईल, दोन तास चालले ऑपरेशन, डॉक्टरही अचंबित
    पैशांच्या वादातून दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी

    पैशाच्या देण्याघेण्यावरून सुनील मिश्रा आणि डिलिव्हरी बॉयमध्ये वाद सुरू झाला. यादरम्यान डिलिव्हरी बॉयने आपल्या मालकाला सांगून दुकानाचा स्टाफ आणि इतर साथीदारांना त्या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर दुकान कर्मचारी आणि इतर डिलिव्हरी बॉय यांचा ग्राहक यांच्यामध्ये वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाला. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed