शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायच्या गाव पातळीवर असतात. अशाच सोसायटीकडून दराडे यांनी कर्ज घेतले होते. त्यांची नेमकी थकबाकी किती होती, हे अद्याप समोर आले नाही. मात्र, या कर्जाच्या नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे पुतणे विक्रम लक्ष्मण दराडे यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरवाडी गावात बाबासाहेब रामभाऊ दराडे राहतात. ५ एप्रिलला घरातच लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन घेत त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यावर नातेवाईक जमा झाले. पोलिसांनाही कळविण्यात आले. मदत करूपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. खर्डा येथील रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांचे पुतणे विक्रम यांनी सांगितले की, बाबासाहेब दराडे हे नेहमी प्रामाणिपणे सोसायटीच्या कर्जाची परतफेड करायचे. कधी त्यांच्याकडे पैसे नसले तर पैसे नसल्याने भरू शकत नसल्याचेही ते सांगायचे. मात्र, थकबाकी झाल्याने नैराश्यातून त्यांनी ५ एप्रिलला घराच्या छताच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी नोंद घेतली असून चौकशी सुरू केली आहे. पोलिस अंमलदार एस. व्ही. शेंडे तपास करीत आहेत.
सरकारला बेशरमाची फुलं पाठवली, शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी कैलास पाटील आक्रमक