• Sun. Sep 22nd, 2024
१०५ फूट उंच हनुमान मूर्ती, १५० किलोंचा हार घालण्यासाठी रिमोट कंट्रोल; बुलढाण्यात भाविकांची गर्दी

बुलढाणा : देशभरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले जात आहेत. राज्यातील हनुमान मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण आहे.
याकरता महिलांनी आणि पुरुषांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रमात भाग घेत चे चित्र आहे .यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात २००० मध्ये १०५ फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक सहावर ही मूर्ती उभारण्यात आली आहे. हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर यंदा दीड ते दोन क्विंटलचा हार चढवण्यात आला आहे.

गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे उत्साहांवर करोनाच्या निर्बंधांचं सावट होतं. मात्र यंदा सण-उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे बुलढाण्यात हनुमान जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळत आहे.

२००३ मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ वर्षांपासून या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. २००० मध्ये या महाकाय हनुमान मूर्तीची नांदुरा येथील मोहनराव यांनी स्थापन केली होती. या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लीम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २००२ मध्ये देखील या मूर्तीची नोंद झाली आहे. शिवाय मूर्तीच्या शेजारी बालाजी मंदिराची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी हनुमान जयंतीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. नांदुरा परिसरातील भाविक या हनुमान मूर्तीची भक्तिभावाने पूजा करत असतात.
बराच वर्षानंतर चैत्रशुक्ल पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि गुरु ग्रह एकत्र आले आहेत. पौर्णिमा आणि हनुमान जन्मोत्सव एकत्र आल्याने गुरुवारचा सोहळा धार्मिक योगाने भरलेला आहे. चंद्र आणि गुरूच्या एकत्र येण्याच्या योगाला गजकेसरी योग म्हणतात. त्यामुळे या दिवशी श्री हनुमानाची केलेली सेवा थेट शनि देवाला पोहोचते अशी भावना आहे.

हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; ३० क्विंटल गहू, १५ क्विंटल तांदूळ, बूंदी,पहाटेपासून महाप्रसादाला सुरुवात

पुण्यात बगाड यात्रेत भीषण अपघात, दोन्ही बाजूचे वीर उंचावरून खाली पडले, धडकी भरवणारी घटना
कोट्यवधी हनुमान भक्त या जयंती कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. अनेक ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा, रामरक्षा पठण, सामूहिक आरती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed