• Sat. Sep 21st, 2024

पाणीटंचाईनं घेतला ८ वर्षांच्या अंजलीचा बळी, ७० फूट खोल विहिरीत पडली, आई-वडिलांचा टाहो

पाणीटंचाईनं घेतला ८ वर्षांच्या अंजलीचा बळी, ७० फूट खोल विहिरीत पडली, आई-वडिलांचा टाहो

बुलडाणा : राज्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमवला आहे. या पाणीटंचाईमुळे अशीच एक भीषण आणि ताजी घटना समोर आली आहे. पाणीटंचाईमुळे एका आठ वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरलं.पाणीटंचाईचा शाप लाभलेल्या बुलडाणा नजिकच्या देऊळघाट येथील एक मुलगी खोल विहिरीत पडली. या घटने ती गंभीर जखमी झाली. या आठ वर्षीय जखमी मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आज रास्ता रोको करत प्रशासन व ग्रामपंचायतीविरोधात रोष व्यक्त केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बुलढाणा पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या गावात तणाव निर्माण झाला आहे. या रास्ता रोकोमुळे बुलढाणा-अजिंठा मार्गावरील वाहतूक किमान चार तासापासून ठप्प झाली होती. अंजली भरत शेजोळ (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे. धनगरवाडी परिसरात असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी ती गेली होती. यावेळी तोल जाऊन अंजली विहिरीत पडली. यात गंभीर जखमी झालेल्या अंजलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रास्ता रोको करत अजिंठा राज्य मार्गावरील वाहतूक रोखली. या सर्वांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. पोलीस आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत समजवण्याचा प्रयत्न केला.
कर्तव्यावर असतानाच मृत्यूने गाठले, तरुण पोलिसाच्या अकाली निधनाने सर्वच हळहळले
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे त्याच विहिरीत पडण्याची ही १०वी घटना आहे. या विहिरीत आतापर्यंत १० जण पडले आहेत. यातील ९ जणांना कायमचं अपंगत्व आलं आहे. दरम्यान, या पाणीटंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुलढाणा अजिंठा महामार्ग रोखून धरला.

बाप लग्न करुन देईना, संतापाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापाचा काटा काढला

देऊळघाट येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. २५ हजार लोकसंख्या असलेल्या देऊळघाट येथील धनगरवाडी परिसरातील अंजली भरत शेजोळ ही मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. त्याच वेळी तिचा पाय घसरून ती ७० फुट खोल विहिरीत पडली. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed