• Mon. Nov 25th, 2024

    आई-वडिलांना घेऊन लेक निघाला, समृद्धी महामार्गावर घडला अपघात, एका क्षणात मुलगा पोरका झाला

    आई-वडिलांना घेऊन लेक निघाला, समृद्धी महामार्गावर घडला अपघात, एका क्षणात मुलगा पोरका झाला

    बुलढाणाः नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा जवळील चॅनल नंबर ३३१.३ जवळ क्रेटा कारला पाठीमागून एका वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा जवळील चॅनल नंबर ३३१.३ जवळ भीषण अपघात झाला. यामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाले तर मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. सदर मार्गाने क्रेटा कार क्रमांक एम एच १४ एफ जी ९१ ०७ चे चालक आशिष पाध्ये त्यांच्या आई वडीलांसह नागपूरकडे जात होते.

    ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा, स्थानकात प्रवाशांना मिळतील या सुविधा
    त्याचवेळी पोलीस स्टेशन सिंदखेडराजा हद्दीत आशिष यांच्या कारला पाठीमागून वाहनाची धडक बसली, ही धडक इतकी भीषण होती की कारमधील चालकाची आई ईश्वरी पाध्ये वय वर्ष साठ आणि वडील अमित पाध्ये वय वर्ष ६७ हे अपघातामध्ये जागेवरच मरण पावले व चालक आशिष पाध्ये यांच्या हाताला मुका मार लागला असून किरकोळ जखमी झाले.

    महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे ढग; या जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे!
    अपघाताची घटना कळताच पोलिस घटनास्थळी दाखल होते. पोलिसांनी मयत व्यक्तींना ॲम्बुलन्सच्या सहाय्याने सिंदखेडराजा सरकारी हॉस्पिटल येथे पाठवले. अपघात ग्रस्त वाहनला क्रेनच्या साह्याने पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे रवाना केले.

    शिर्डीतील रामनवमी यात्रेत ब्रेक डान्स पाळणा अचानक तुटला; पाच जण गंभीर जखमी, चालकाचा हलगर्जीपणा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed