सोलापूर : सोलापूर येथील आडत व्यापाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुनमळी येथील कांदा उत्पादकाला २ लाख ३३ हजार रुपयांना फसविले आहे. या प्रकरणी साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्यात ह्या फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर येथील राजकुमार माशाळकर आणि नारायण माशाळकर अशी संशयित कांदे व्यापाऱ्यांची नावे आहेत.या संदर्भात साक्री तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी सचिन पवार ( वय ३२, राहणार रुनमळी ता. साक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रुनमळी शिवारात सचिन पवार यांची शेती आहे. सचिन पवार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शेतीत कांदा पिकाचे उत्पादन घेत असतात. मागील ५ सप्टेंबर २०२२ च्या रात्री व्यापाऱ्यांनी पवार यांच्याकडून कांद्याच्या ५५३ गोण्या घेऊन गेले.
शेतकऱ्याने मुलाला कामासाठी तालुक्याला पाठवले, मनात होते वेगळेच, जे केले ते पाहून बसला धक्का
परंतु, संबंधित सोलापूर येथील आडत व्यापाऱ्यांनी कांदा विक्रीचा खर्च वजा करून सचिन पवार यांना २ लाख ३३ हजार ८९५ रुपये दिलेच नाहीत. उलट त्या आडत व्यापाऱ्यांनी सचिन पवार यांना शिवीगाळ करून धमकी दिली आणि सांगितले की तुझे पैसे आम्ही देत नाही जा तुला काय वाटले ते कर अशी धमकी त्यांनी सचिन पवार यांना दिली.बीडच्या तरुणाची संघर्षगाथा, गायक होण्याचं स्वप्न भंगलं, आता बर्फगोळा विकून कमावले नाव, पैसा
व्यापारी राजकुमार आणि नारायण माशाळकर यांचे सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड मधील गाळा क्रमांक १५२ मध्ये दुकान आहे. सोलापूर येथील सिद्धेश्वर मार्केट यार्ड या ठिकाणी त्यांचा कांद्याचा व्यवसाय चालतो, अशी माहिती सचिन पवार यांनी निजामपूर पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास सुरू केला आहे.
नागपुरात खळबळ! सूफी संत ताजुद्दीनबाबांचे वंशज सय्यद तालिबबाबा यांना अतिरेक्यांकडून धमकीचे ईमेल