• Sat. Sep 21st, 2024

फिरायला गेलेली युवती बुडाली, नीरा नदीपात्रात उतरली पण अंदाज चुकला, पोलिसांनी शोधलं पण अखेर..

फिरायला गेलेली युवती बुडाली, नीरा नदीपात्रात उतरली पण अंदाज चुकला, पोलिसांनी शोधलं पण अखेर..

सातारा : सातारा जिल्ह्यातील हरतळी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत नीरा नदीपात्रात येथील २३ वर्षीय युवती बुडाली आहे. तेजल आप्पासो साळूंखे (वय २३, रा. वरुड, ता. खटाव, जि. सातारा) बुडालेल्या युवतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिरवळ रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स यांना पाचारण करण्यात आलं होतं. या टीमच्या सदस्यांच्या सहकार्याने नीरा नदी पात्रात शिरवळ पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अंधार पडेपर्यंत युवती न सापडल्यानं शोध मोहीम स्थगित करण्यात आली.

याबाबत शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील सातारा जिल्ह्यातील खटाव येथील वरुड येथील युवती तेजल साळुंखे ही सोमवारी भाटघर धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. हरतळी (ता. खंडाळा) हद्दीत असणाऱ्या एका पुलाजवळील नीरा नदीपात्रात तेजल साळूंखे ही उतरली असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडली. भाटघर धरणाच्या पावर हाऊसमधून नदीपात्रात पाणी सोडल्याने पाण्याचा वेग जास्त असल्याने बुडून बेपत्ता झाली.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, अंनिस कार्यकर्ते पोहोचले अन् थेट ‘तो’ डेमो दाखवला

यावेळी घटनास्थळी असणाऱ्या व्यक्तीनं भोर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. भोर पोलीस, शिरवळ पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित रेस्क्यू टीमला फोन करून बोलावून घेतले. आज ४ एप्रिल रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, शिरवळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कोलवडकर, अजित बोराटे यांनी नीरा नदीपात्रात शोधमोहीम राबविली.

Kolhapur : राजारामचे सभासदच विरोधकांचा काटा काढतील – अमल महाडिक

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होती. त्यांनी पोलिसांना शोधकार्य करण्यासाठी सहकार्य केलं. मात्र, मुलीचा शोध न लागल्यानं रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली.

ऋषभ पंतने दिलेला शब्द पाळला… दिल्लीच्या मैदानात सामना होत असताना काय केलं पाहा…

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed