• Sat. Sep 21st, 2024
कारगिल गाजवणारा हिरो भारत-चीन सीमेवर धारातीर्थी, शहीद अजय ढगळेंना मुलीकडून मुखाग्नी

Indian Army Jawan died in avalanche | शहीद अजय ढगळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोरवणे गावात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

martyr Ajya dhagale
शहीद अजय ढगळे यांच्यावर चिपळूणमध्ये अंत्यसंस्कार

हायलाइट्स:

  • शहीद अजय ढगळे पंचत्वात विलीन
  • शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार
  • कारगिलच्या लढाईत टायगर हिल जिंकणाऱ्या टीमचा हिस्सा
रत्नागिरी/चिपळूण: चिपळूण मोरवणे येथील शहीद अजय ढगळे यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुभेदार अजय ढगळे पंचत्वात विलीन झाले.अजय ढगळे यांच्या पार्थिवावर मोरवणे या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुभेदार अजय यांची मुलगी रिया हिने पार्थिवाला अग्नी दिला.सुभेदार अजय हे गेली जवळपास २७ वर्षे देशसेवेत होते ते ४६ वर्षांचे होते.

शहीद अजय ढगळे यांच्या अंत्यसंस्कारसाठी मोठा जनसमुदाय जमला आहे.पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम आणि प्रशासकीय अधिकारी,माजी सैनिक यांची उपस्थिती आहे. हुतात्मा सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव काल भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने रत्नागिरीत आणण्यात आले होते. २७ मार्चला भारत चीन सीमेवर तवांग परिसरात रस्त्याच्या रेकीसाठी गेले होते. त्यावेळी सुभेदार अजय ढगळे भूस्खलनात सुभेदार ढगळे यांना वीरमरण आले. शहीद अजय ढगळे हे कारगिल लढाईमध्ये टायगर हिल जिंकणाऱ्या जांबाज बहादुर टीमचा सुद्धा हिस्सा होते. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुली, भाऊ भावजय पुतण्या असा मोठा परिवार आहे. शहिद अजय यांचे वडीलही सैन्यात होते त्यांचे चुलते चुलतभाऊ सैन्यात आहेत ढगळे कुटूंबाला देशसेवेची परंपरा लाभली असुन अवघा मोरवणे गाव हा जवानांचा गाव म्हणून ओळखला जातो. येथील नव्वद टक्के युवक सैन्यात देशसेवेसाठी दाखल आहेत. ही या मोरवणे गावाची वैशिष्ट्यपूर्ण अभिनमानास्पद अशी परंपरा आहे.

जवानांच्या गावावर शोककळा, भारत-चीन सीमेवर रेकी करताना मोरवणे गावचे सुपुत्र अजय ढगळे शहीद

रेकी करायला गेले अन् घात झाला

भारत-चीन सीमेवर रस्ता तयार करण्यासाठी लष्कराकडून सिक्कीममध्ये पाहणी सुरु होती. मार्च महिन्यात अजय ढगळे हे त्यांच्या पथकासह या भागामध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी या भागात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होऊन भूस्खलन झाले. त्यामुळे अजय ढगळे आणि त्यांच्यासोबतचे जवान माती आणि बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यांना शोधण्यासाठी भारतीय लष्कराकडून जवळपास सहा महिने शोधमोहीम सुरु होती. अखेर शनिवारी चिखल, दगड आणि बर्फाच्या खाली अडकलेले ढगळे व इतर चार जवानांचे मृतदेह हाती आले होते. त्यांच्या निधनामुळे मोरवणे गावावर शोककळा पसरली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed