मोदी- अदानी’ ही नावे आता भ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत. अदानींची संपत्ती ही मोदींचीच आहे, खरे मालक मोदीच आहेत, असे केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत पुराव्यासह सांगितले. गौतम अदानी आणि पंतप्रधान मोदी यांचे नाते नेमके काय? अदानी यांच्या भ्रष्टाचाराचे संरक्षक म्हणून पंतप्रधान पहाडासारखे का उभे आहेत? अदानी यांच्या कंपनीत बेकायदेशीरपणे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये नक्की कोणाचे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले. त्या प्रश्नाची उत्तरे निदान ‘ईडी’ आणि सीबीआयने तरी द्यायला हवीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अदानी यांची सर्व संपत्ती ही श्री. मोदी यांचीच आहे. अदानी हा फक्त चेहरा आहे. त्यांच्या सर्व संपत्तीचे खरे मालक आपले ‘फकीर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत,” असा आरोप श्री. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत केला. मोदी व त्यांच्या मंडळींचा पैसा अदानी ‘मॅनेज’ करतात व अदानी यांना फक्त 10-20 टक्के कमिशन मिळते, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल पुराव्यासह करतात व ईडी, सीबीआय त्यावर गप्प बसते. न्यायालये ‘स्युमोटो’ पद्धतीने पुढे जात नाहीत. अशा विकलांग अवस्थेत आज आपला देश असल्याची टिप्पणी ‘रोखठोक’मधून करण्यात आली आहे.
भाजपच्या बड्या नेत्याने सांगितलं मोदी-अदानींच्या घट्ट मैत्रीचं कारण
संजय राऊत यांच्याकडून ‘रोखठोक’ या सदरात अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. केजरीवाल म्हणतात, “एक भाजपचे बडे नेते त्यांना भेटले. मोदी अदानी नात्यावर दोघांत चर्चा केली. मोदीजी अदानी यांना इतकी मदत करतात त्याचे कारण काय?” असे त्या भाजप नेत्याने विचारले. “अदानी मोदींचे मित्र आहेत. केजरीवाल. “मित्र? आतापर्यंत मोदी यांनी कधीच कुणाला मदत केल्याचे उदाहरण नाही.”भाजप नेता
भाजपा नेता
“मग?” केजरीवाल,
“आपल्या पत्नीसाठी त्यांनी काहीच केले नाही. आपल्या आईसाठीही काही केले नाही. त्यांचे भाऊ, नातेवाईक गुजरातमध्ये राहतात. त्यांच्यासाठी काहीच केले नाही. राजकीय गुरूसाठी काही केले नाही मग एका मित्रासाठी ते सर्वकाही करतील. है कसे शक्य आहे? मित्रावर ते इतके मेहेरबान का आहेत? ही अशी काय दोस्ती आहे?” भाजपा नेता..
“मग काय मामला आहे?” केजरीवाल, विचार करा. इतका मोठा घोटाळा झाला. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला. चारही बाजूंनी छी थू झाली. अदानी समूह कोसळला. मोदी हे इतके स्वार्थी गृहस्थ आहेत व मामला फक्त ‘दोस्ती’ पुरता मर्यादित असता तर दोन मिनिटांत त्यांनी अदानीला झटकून दूर केले असते. माझा त्या काही संबंध नाही सांगून मोकळे झाले असते, पण मोदी आजही अदानीला वाचविण्याच्या मागे लागले आहेत.’
“इतके होऊनही स्टेट बँक, प्रॉव्हिडंट फंडला त्यांनी सांगितले, अदानीला पैसे द्या. त्याला मदत करा. हे का?”
“मग मोदी स्वतःची बदनामी स्वीकारून अदानीला संरक्षण का देत आहेत?” केजरीवाल.
‘अदानी हा फक्त मुखवटा आहे. अदानीमध्ये सर्व पैसे मोदींचे लागले आहेत. अदानी मोदींचे सर्व पैसे मॅनेज करतो. तो मोदींचा मॅनेजर आहे. उद्या या प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘जेपीसी’ लागली तर अदानी बुडणार नाही, मोदी डुबतील.” भाजपा नेता. “मोदींना इतक्या पैशांची काय गरज आहे? त्यांच्या मागेपुढे कोणीच नाही. “केजरीवाल.
“साहेब, ही गरज नसून पैशांची हाव आहे. मोदींमध्ये ती हाव आहे!” ज्या दिवशी अदानी जगातील दुसरे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनले ते अदानी नव्हते, तर आपले मोदी हेच जगातले सगळ्यात श्रीमंत दुसऱ्या क्रमाकांची व्यक्ती बनले होते, असे संबंधित भाजप नेत्याने केजरीवाल यांना सांगितल्याचा उल्लेख ‘रोखठोक’मध्ये करण्यात आला आहे.
आता मोदींना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय
केजरीवाल यांना भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, आता मोदींचे स्वप्न आहे, ते जगातले पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत बनू इच्छितात. ज्या देशाच्या पंतप्रधानाला सर्वाधिक श्रीमंत होण्याचा छंद जडला आहे तो स्वतला ‘फकीर’ म्हणवून घेतो व विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणतो. हे सरळ सरळ दोग आहे श्री केजरीवाल यांनी अदानी यांनी गिळकृत केलेल्या सर्व कंपन्यांची यादीच जाहीर केली. मुंबईसह सहा विमानतळाचा कारभार अदानी यांना देता यावा यासाठी नियम बदलण्यात आले. सीबीआय आणि ईडीने थाड़ी घातल्यावर कृष्णापटनम पोर्ट अदानीच्या ताब्यात आले. मुंबईचा विमानतळ ‘जीव्हीके’ कंपनीच्या मुंबईचा विमानतळ ‘जीव्हीके’ कंपनीच्या ताब्यात होता. जीव्हीकेवर ईडी- सीबीआयचा वापर केला व मुंबई विमानतळ अदानीच्या ताब्यात आले. अंबुजा सिमेंटचेही तेच झाले. जगभरातील अनेक सौदे व प्रकल्प मोदी यांनी फक्त अदानीच्या खिशात घातले. एका उद्योगपतीच्या घशात देशाची सर्व संपत्ती घालण्याचे कारण काय ? हा केजरीवाल यांचा प्रश्न. त्या प्रश्नाचे उत्तरही केजरीवाल यांनी दिले. “अदानी फक्त ‘फ्रण्टमॅन’ आहेत. त्यांच्या संपत्तीचे खरे मालक मोदी हेच आहेत, असे संबंधित भाजप नेत्याने केजरीवालांना सांगितले.