• Mon. Nov 25th, 2024

    इमारतीचं काम सुरु, वरच्या मजल्यावरून पडलेली सळई सीसीटीव्ही लावणाऱ्याच्या खांद्यातून आरपार

    इमारतीचं काम सुरु, वरच्या मजल्यावरून पडलेली सळई सीसीटीव्ही लावणाऱ्याच्या खांद्यातून आरपार

    ठाणे: एका निर्माणाधीन इमारतीवरून पडलेली सळई खाली उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरात घुसून थेट आरपार निघाल्याची धडकी भरवणारी घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या तरुणावर शस्त्रक्रिया करुन त्याच्या शरीरातील सळई काढण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.बदलापूर पूर्वेच्या पनवेलकर हायवे लगत ठाणेकर पॅलेसिओ नावाच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाच्या खाली रिलायन्स मार्ट सुरू होत आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या रिलायन्स मार्ट दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग करण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कामगार काम करत होता. या इमारतीचं बांधकाम सुरू असल्यामुळे आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली पडली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि थेट पाठीतून आरपार झाली.

    रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले


    या घटनेमुळे तिथे काम करत असलेल्या कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर सत्यप्रकाश याला तातडीने गांधी चौकातील निर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करत त्याच्या शरीरात घुसलेली सळई काढली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे.

    पत्नी घरी आली, दीड वर्षांची मुलगी दिसली नाही, पती म्हणाला – मित्राकडे ठेवलंय तिला, पण…
    याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ठाणेकर पॅलेसियो गृह प्रकल्पाचे विकासक अजय ठाणेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, बांधकामात होत असलेल्या निष्काळजीपणामुळेच इतकी मोठी घटना घडली. जर ती सळई कामगाराच्या खांद्याऐवजी मानेत किंवा डोक्यात घुसली असती तर त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

    मुलाकडे ३० कोटींची संपत्ती, पण आम्हाला शिळी चपाती देतो, IAS च्या आजी-आजोबांनी आयुष्य संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed