• Mon. Nov 25th, 2024

    Gadchiroli : पोलीस नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक, एक नक्षलवादी ठार

    Gadchiroli : पोलीस नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगड सीमेवरील जंगलात चकमक, एक नक्षलवादी ठार

    गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाड जंगल परिसरात सकाळपासून पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत आहे. शुक्रवारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने एटापल्ली व भामरागड तालुक्यालगत छत्तीसगड सीमेवर अबुझमाड परिसरात नाक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

    शाळा सुटली, स्विटी घराकडे निघाली; गावाजवळ पोहोचताच नियतीनं घात केला; सारेच हळहळले
    विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पार्ट्यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये एक मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या चकामकीनंतर गडचिरोली पोलीस दालने या भागात सर्चिंग ऑपरेशन अधिक तीव्र केलं आहे.

    ऐकू तुला येतेय का?; आंदोलन कर्मचाऱ्यांची गाण्यातून फडणवीसांवर टीका

    महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर सर्चिंग ऑपरेशन राबविले असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. त्यासोबतच काही साहित्य आणि शस्त्रसाठा मिळाला आहे.

    – निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed