नागपूर : संभाजीनगर आणि जळगाव येथील हिंसाचारामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद सोडावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक जण नाराज आहेत. पण लक्षात ठेवा मी गृहमंत्री होतो, आहे आणि राहणार आहे’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.नागपुरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रश्न विचारण्यात आला. ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत, हे मला माहीत आहे. मी गृहमंत्री होऊ नये, अशी अनेकांची इच्छा आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो. मी गृहमंत्री राहणारच आहे’, असं फडणवीस म्हणाले. ‘मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. राज्यात चुकीचं काम करणाऱ्यांना शिक्षा केल्याशिवाय मी शांत बसणार नाही’, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार? जुन्या प्रकरणात नामुष्की
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी फडणवीस यांनी माहिती दिली. ‘राऊत यांना धमकीचा फोन करणार्याची ओळख पटली आहे. प्राथमिक निष्कर्षानुसार सदर व्यक्ती ही दारुच्या नशेत होती. तथापि या प्रकरणाचा सरकार तपास करेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल’, असं फडणवीस यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे सत्तेसाठी युतीत, एकेरी उल्लेख करत बावनकुळेंची टीका
‘या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तरी कारवाई निश्चितपणे केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. सरकार त्यावर कारवाई करेल’, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.