• Sat. Nov 16th, 2024

    मजूर जेवण करायला बसले, अचानक मोठा स्फोट झाला, जाऊन पाहतात तर सहकारी रक्ताच्या थारोळ्यात

    मजूर जेवण करायला बसले, अचानक मोठा स्फोट झाला, जाऊन पाहतात तर सहकारी रक्ताच्या थारोळ्यात

    अकोला: अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बेलूरा ते तांदळी फाट्यावर असलेल्या बंदूकवाला फटाका केंद्र या फटाका फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये गोदामातील फटाके जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय या आगीत मोठी जीवितहानी झालेली आहे. या ब्लास्टची तीव्रता अधिक असल्याने भिंत तडे जाऊन कोसळली आहे. या अपघातात इथे काम करणाऱ्या ६ मजुरांपैकी एका मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी तर ४ जण किरकोळ जखमी आहेत. सद्यस्थित सर्व जखमींवर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात बेलूरा ते तांदळी फाट्यावर ताहीर अब्बाशी शकील अहमेद यांचं बंदूकला नावाने फटाका केंद्र म्हणजे फटाका फॅक्टरी आहे. या फटाका केंद्रामध्ये फटाके तयार करण्याचं काम सुरू होतं. या फटाका केंद्रात काम करण्यासाठी आज तब्बल ३५ मजुरांनी हजेरी लावली होती. यावेळी आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण खोली पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. या घटनेत फटाका केंद्रात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख रज्जाक शेख गुलाब (वय ७० वर्ष, लक्ष्मी नगर, अकोट फ़ैल.) असं मृत व्यक्तीच नाव आहे. तर पाच मजूर जखमी झाले आहे. यामधील एक मजूर सद्यस्थित गंभीर जखमी आहे. या सर्व जखमी मजुरांवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची समजते.

    पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेरील प्रवास महागला, चालकांना आता मोजावे लागणार इतके पैसे, वाचा सविस्तर
    सुरेश नामदेव दामोदर (वय ५०, राहणार तांदळी), धम्मपाल सिताराम खंडेराव (वय ३६, राहणार तांदळी), महेश किसन खंडेराव (वय ३२, राहणार तांदळी), रीना मंगेश खंडेराव (वय ३०, राहणार तांदळी), असे फटाका फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या जखमी मजुरांची नावे आहे. दरम्यान फाटका कारखान्यात स्फोट वाढत्या उन्हामुळे झाला की निष्काळजीपणा मुळे? याचा तपास आता पातूर पोलीस घेत आहे. तरीही फाटका कारखान्यात झालेल्या ब्लास्टचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. या भीषण ब्लास्टमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके जळून खाक झाले असून, याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या बंब, तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

    नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याचा कुनोमध्ये मृत्यू, साशाला झाला होता गंभीर आजार
    आज नेहमीप्रमाणे फटाका फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी ३५ मजूर दाखल झाले होते. यातील काही मजूर म्हणजे २५ हून अधिक मजूर जेवण करण्यासाठी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फटाका फॅक्टरीपासून जवळपास ५०० मीटर अंतरावर गेले होते. मजूर जेवायला बसलेच तेवढ्यात या फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. या ब्लास्टची तीव्रता अधिक असल्याने भिंतीला तडे जाऊन पूर्ण खोली कोसळली आहे. अन् भिंतीचे तुकडे जवळपास दोनशे मीटर दुरवर उडाले. दरम्यान हे मजूर सदर फटाका फॅक्टरीपासून दूर जेवणासाठी गेल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्यासह त्यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटा दिल्या आणि घटनेचा पंचनामा केला आहे.

    दरवर्षी पुराच्या गाळात बुजणारं महादेवाचं मंदिर; पिंडीला बाहेर काढण्यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed