• Mon. Nov 25th, 2024
    पुण्यात भीषण अपघात; दारुच्या नशेत तर्राट असलेल्या पिक अप चालकाने ८ जणांना चिरडलं, ५ जण ठार

    जुन्नर,पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या जात असणाऱ्या शेतमजुरांना नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यात एका चिमुकल्याचा आणि आणखी एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन चिमुकल्या, आणि दोन पुरुष एक महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण शेतमजुर असल्याची माहिती समोर आली आहे.

    Video : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा अंत

    याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शेतमजूर पारनेर तालुक्यातून शेत मजुरीसाठी आले होते. मजुरीची कामे उरकून ते आपल्या घरी जात होते. दुचाकीवरून ते घरी जात असताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पीक अप जीपने या आठ जणांना जोरात धडक दिली त्यात ते चिरडले गेले.त्यात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पारनेर तालुक्यातील गावाला जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.

    भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली, फरफटत नेल्याने ११ वर्षीय समर्थचा जागीच मृत्यू; अपघाताचा थरारक CCTV फुटेज

    नगर-कल्याण महामार्गावर असणाऱ्या लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला आहे. हे सर्व मजूर दुचाकीवरून आपल्या घरी जात होते. नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. मृतांमध्ये सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

    सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed