तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांना बीडमधील कार्यक्रमातील वक्तव्यावरुन प्रश्न विचारले आहेत. तुम्ही महिलांचा अपमान करता, बदनामी करता, शिवराळ भाषा वापरता तुमच्यावर अशी नामुष्की आली की महिलांविषयी चुकीचं बोलल्यामुळं व्हिडिओ यूट्यूबवरुन डीलीट करावे लागले आहेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
आता एखादी महिला लावणी सम्राज्ञी म्हणून समोर आली तर तिच्या लाखो रुपयांवर तुम्ही बोलता. तुम्ही पाच हजार रुपये घेत नाही, तुम्ही किती पैसे घेता, हे सर्वांना माहिती आहे. राजकारणी तुमच्यावर पांघरुण का घालतात हे सर्वांना माहिती आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्यामुळं एखादी महिला पुढं चालली की त्याविषयी बोलून स्वत:चं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करता. फक्त पैसा तुम्हीच कमवायचा का, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.
तुम्ही ज्या महिलेविषयी बोलता गौतमी पाटील आहेत त्या लावणी करतात. तुम्ही कीर्तन करता, कीर्तनातून प्रबोधन करताना लोक जे देतील ते स्वीकारायचं असतं. तुम्हाला ५ हजार रुपये घेऊन जर कुणी बदनाम केलं जात असतं तर आम्ही आवाज उठवला असता, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
काही कीर्तनकार चांगले आहेत जे जनता देईल त्या मानधनावर कीर्तन करतात. इंदोरीकर आणि अनेक काही असे लोक आहेत जे मोठमोठे आकडे सांगतात आणि पैसे स्वीकारतात, अशी टीका देखील तृप्ती देसाई यांनी केली.
गौतमी पाटील बोलावून स्वत:हून मानधन देत असतील तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय आहे. तिला चांगलं बोलेल, वाईट बोलेल पण तुम्ही बोललात म्हणजे महिला पुढं गेलेली तुम्हाला वाईट वाटलं आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.