• Mon. Nov 25th, 2024

    लेकीचं लग्न ठरवलं, बापाने कर्ज काढून तयारी केली, पण नवरदेव आलाच नाही, कारण ऐकून सगळेच हादरले

    लेकीचं लग्न ठरवलं, बापाने कर्ज काढून तयारी केली, पण नवरदेव आलाच नाही, कारण ऐकून सगळेच हादरले

    सोनभद्रः नवरी नटुन थटून बसली, लग्नाचा मांडव सजला, वऱ्हाडीदेखील आले मात्र, नवरदेवाचा पत्ताच नाही. वधुपक्षाने संपूर्ण रात्र वरातीची वाट पाहिली पण शेवटपर्यंत वरात आलीच नाही. अखेर वाट पाहून वैतागलेल्या वधुपक्षाने महिला हेल्प लाइन व स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास करता नवरदेवाबाबत मिळालेली माहिती ऐकून नवरीला व तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. उत्तर प्रदेशमधील बीजपुर येथील रामसहाय गौड यांच्या मुलीचे गोरखपुर येथील एका मुलाशी ठरलं होतं. अग्रवाल धर्मशाळा इथे हे लग्न होणार होतं. मुलीच्या वडिलांनी सर्व तयारी करुन ठेवली होती. वरातीचं स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज होते. मात्र नवरदेव वरात घेऊन आलाच नाही. शनिवार लग्न होणार होतं मात्र रविवारचा दिवस उजाडला तरीदेखील नवरदेवाचा काहीच पत्ता नव्हता. शेवटी नवरीने वैतागून महिला हेल्प लाइनला फोन करुन मदतीची मागणी केली. याविषयी माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले व तपास सुरु केला. तपासात पोलिसांना मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरीची सावत्र आई पूजाची इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघंही एकमेकांसोबत बोलू लागले तसंच, त्यांच्यातील जवळीकदेखील वाढू लागली. पुजाने तिच्या सावत्र मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव तिच्या प्रियकरासमोर ठेवला. त्यानेही तो लगेच स्वीकारला. त्यानंतर पुजाने घरच्यांना याबाबत सांगितलं व त्यांना लग्नासाठी तयार केलं. नवरीच्या घरचे व मुलाचे घरच्यांचे फक्त फोनवरच बोलणं होतं होतं. ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत. वधुच्या घरच्यांनी नवरदेवाचं घरही प्रत्यक्षात न बघता लग्न ठरवलं. तसंच, दोघांचा साखरपुडाही झाला नाही. दोन्ही कुटुंबीयांचे बोलणे फक्त फोनवरच होत होते. फोनवरच लग्नाची तारीखही काढण्यात आली. वधुच्या वडिलांनी कर्ज काढून लेकीच्या लग्नाची तयारी केली. लग्नाच्या पत्रिकादेखील छापल्या. मात्र, ऐनवेळी नवऱ्याच मांडवात पोहोचला नाही.
    चार मुलांना घेऊन विहिरीत उडी घेतली, नंतर भीती वाटली, एका मुलीसोबत बाहेर पडली, पण घडलं अघटित
    पोलिसांनी याबाबत नवऱ्यामुलाला जाब विचारताच त्याने दिलेले उत्तर एकून सगळेच आश्चर्यचकित झाले. नवऱ्यामुलाने लग्नाबाबत कोणतंही बोलंण झालं नसल्याचं म्हटलं आहे. नवरीच्या सावत्र आईसोबत मी फक्त इन्स्टाग्रामवर बोलायचो. काही महिन्यांतर तिने तिच्या सावत्र मुलीसोबत लग्न कर म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसंच, त्या लोकांनी स्वतःच लग्नाची तारीख काढून तयारी सुरु केली. यात आमच्या कोणाचीच काही चूक नाहीये, असंही तो म्हणाला.

    रेल्वेचा ‘तो’ कर्मचारी २२ वर्षांनंतर सेवेत पुन्हा रुजू होणार, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन केले होते बडतर्फ
    दरम्यान, या प्रकरणी वधुच्या घरच्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाहीये. तसंच, नवरीकडच्यांनी मुलाची कोणतीही चौकशी न करता लग्न ठरवले, असं म्हणत स्वतःच चुक मान्य केली आहे.

    सभागृहाबाहेर येताच आदित्य ठाकरे म्हणाले, लग्नासाठी मला उपमुख्यमंत्र्यांकडून धमकी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *