• Sat. Sep 21st, 2024
अपघातात वडील-पोरगं जखमी, रस्त्यावर विव्हळत होते, तेवढ्यात देवदूत धावून आला अन्…

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा नंदुरबार रस्त्यावर खांडबारा वाटवी या गावा दरम्यान दोन मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पिता पुत्र दोघेही जखमी झाले होते. मात्र, यावेळी रुग्णवाहिकेची वाट न पाहता अपघात ग्रस्त लहान मुलाला घटनास्थळी असलेल्या स्थानिकांनी दुचाकीवरून रुग्णालयात पोहचवून जीवनदान देत माणुसकी जपली आहे.दुचाकींचा अपघात, वडील आणि मुलगा गंभीर जखमी

खांडबारा वाटवी गावाजवळ अपघात झाल्यानंतर पिता-पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यात आयुष राकेश गावित (अंदाजे वय १२ वर्ष) हा लहान मुलगा गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. त्याच्या डोक्यावर जबर मार लागल्याने रक्तस्राव सुरू होता. त्याचवेळी तेथून मोटरसायकल घेऊन जात असलेला अल्तामस बेलदार या युवकाने रुग्णवाहिकेची वाट न बघता सदर मुलाला उचलून मोटरसायकल वरून खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्यामुळे आयुष राकेश गावित या लहान मुलाचे प्राण वाचले आहे.

मुलगा सतत आजारी, तांत्रिक म्हणाला बळी दे, मग १० वर्षांच्या भावासोबत जे घडलं ते हादरवणारं
रुग्णवाहिकेची वाट न पाहता दुचाकीवरुन रुग्णालयात नेलं

अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मदत करण्यासाठी सरकार द्वारा अनेक बोर्ड लावले जातात तरीही काही लोक मदत करण्याऐवजी बघण्याची भूमिका घेत असतात. असे न करता अपघात झाल्यावर मदत करणे हे गरजेचे आहे. रुग्णवाहिकेची वाट न बघता वेळेवर लहान मुलाला अल्तामस बेलदार या युवकाने मोटरसायकलीवरून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. या युवकाचे कौतुक केले जात असून माणुसकीचे दर्शन घडले असल्याचे दिसून आले आहे.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed