• Mon. Nov 25th, 2024

    काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

    काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना माहिम येथील समुद्रातील बांधकाम आणि सांगलीतील मशिदीचं अनधिकृत बांधकामाकडे लक्ष वेधत राज्य सरकारला काढण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारकडून त्यावर कारवाई करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यानं ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

    कुटुंबानं चाकू पाहिला, चेतनला फेकायला लावला, तरीही हल्ला झाला; ग्रँटरोडच्या चाळीत काय घडलं?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असेही सांगितले होते. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

    कुटुंब देवदर्शनाला गेलं, माघारी येताना घात झाला, घरातील कर्ता व्यक्ती गेला, पाच जण जखमी

    राज ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांना सल्ला
    राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाला आहात तर राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा सल्ला दिला होता. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतील तिकडे सभा घेऊ नका, असा सल्ला देखील राज ठाकरेंनी दिला होता. राज्यातील शेतकऱ्यांचे आणि इतर महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या, असं राज ठाकरे म्हणाले होते.

    निखत जरीनचा सलग दुसरा गोल्डन पंच, भारताच्या लेकीने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed