मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही असे सांगतानाच होय, ही शिवसेनाच आहे… मी शिवसेनाच म्हणते, माझ्या वडिलांनी स्थापन केलेली ही शिवसेना आहे, मिंधेंच्या वडिलांनी नाही, असा शब्दांत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ठाकरे यांनी शेतकरीपुत्र म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या शेतात दोन-दोन हॅलिपॅड बांधून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला आहे.मालेगावच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ताशेरे ओढताना ठाकरे म्हणाले की, ज्यांच्या गळ्यात दोरी बांधून घंटा बाधलेली आहे ते काय समस्या सोडवणार…हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत असे म्हणतात. आपले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात. यांच्या शेतात दोन-दोन हेलिपॅड आहेत. दुसरीकडे शेतकरी कर्जात डुंबले आहेत, त्यांच्या बांधावर जायला त्यांच्याकडे वेळ नाही. अवकाळी पाऊस मुख्यमंत्र्यांना आणि कृषी मंत्र्यांना दिसला नाही. माझा शेतकरी रात्री अपरात्री शेतात जातो त्यावेळी त्यांना साप चावतात,विंचू चावतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे होत असतं असं हे लोक बोलायचं असतं की जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे असतात.
‘हे खोक्यात घातलेले मिंधे आहेत’
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिंधे गटाला ४८ जागा देणार असे म्हणाले. तुमच्या नावाच ५२ आहे, तर मिंधे गटाला ५ जागा तरी द्या. हे तुमच्या खोक्यात घुसलेले मिंधे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकेचे प्रहार केले.
‘हे खोक्यात घातलेले मिंधे आहेत’
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिंधे गटाला ४८ जागा देणार असे म्हणाले. तुमच्या नावाच ५२ आहे, तर मिंधे गटाला ५ जागा तरी द्या. हे तुमच्या खोक्यात घुसलेले मिंधे आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकेचे प्रहार केले.
भाजपला दिले आव्हान
तुम्ही म्हणजे भाजप मिंधेच्या नेतृत्वात निवडणुका लढणार का हे भाजपने जाहीर करावे, असे आवाहन ठाकरे यांनी भाजपला केले आहे. जर भाजपला असं वाटत असेल की शिवसेना ही ठाकरेंपासून तोडू, मात्र तुमचे ५२ काय, पण १५२ कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही. हिम्मत असेल तर तातडीने निवडणुका घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो मग कोण जिंकतंय ते बघू, असे ठाकरे म्हणाले.