• Fri. Mar 13th, 2026

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2023
    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

     मुंबई,दि:१२ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed