• Thu. Sep 10th, 2026

 यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2023
 यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन

नवी दिल्ली, दि: १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथील दोन्ही महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहातील यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील त्यांच्या पुतळ्यास प्रभारी निवासी आयुक्त तथा अपर निवासी आयुक्त  निवा जैन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed