दहा मार्च रोजी सायंकाळच्या वेळी एका व्यक्तीला त्यांनी शौचास जाताना जो डब्बा घेऊन गेला होता तो डब्बा एका ठिकाणी विहिरीच्या बाजूला सापडला. त्या डब्याची ओळख पटली आणि त्यानंतर लगेचच गावकऱ्यांसह लक्ष्मण सोळंके यांनी पोलिसांना याविषयी माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. इतरत्र शोध घेऊन तो सापडत नसल्याने अखेर ज्या ठिकाणी डब्बा सापडला त्या विहिरीत काही तासांनी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत वर आला.
महेश सोळंकी याचाच मृतदेह असल्याची शंका पोलिसांना आली. त्यानंतर महेशच्या वडिलांना बोलवताच हा महेशचाच मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं. तीन-चार दिवसांपासून या पाण्यात हा मृतदेह असल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विहिरीच्या बाजूलाच त्याच्यावर शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अवघ्या २५ वर्षाच्या महेशचा हा मृत्यू नेमकं कसा झाला ही आत्महत्या की हत्या हाच प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभा राहिला आहे.
महेशच्या अकाली मृत्यूने सोळंके कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून महेशचा शोध घेणारे सर्व नातेवाईक महेशचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे.
फुलं,हार, नारळ पाण्यात सडली, दुर्गंधी, घाण; कंकालेश्वर मंदिरासाठी तरुणांनी कंबर कसली, हाती घेतला झाडू