• Sun. Nov 17th, 2024
    VIDEO कॉलवर बोलत बेस्ट बस चालकाचे ड्रायव्हिंग, नेटिझनच्या दाव्यामुळे खळबळ

    मुंबई : वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही मुंबईत अनेक ठिकाणी वाहन चालक मोबाईलवर बोलताना दिसतात. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बसचा चालक चक्क व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा दावा केला जात आहे. ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चालक बेस्ट बस चालवत असतानाच व्हिडिओ कॉलवर संभाषण करत असल्याचं दिसत आहे.

    मुंबईतील कुर्ला स्टेशनहून कालिना भागात जाणाऱ्या बेस्ट बस क्रमांक ३१३ चा चालक एक पाऊल पुढे जात बस चालवताना व्हिडिओ कॉलवर बोलत असल्याचा दावा केला जात आहे. Chinmay84872047 असे ट्विटर आयडी असलेल्या युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

    काय म्हटलंय ट्विटमध्ये?

    ‘नागरिकांसाठी बस चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे हा गुन्हा नाही का? कुर्ला स्टेशनहून कालिनाला ३१३ क्रमांकाच्या बसने जात असताना माझ्या मित्राने ही परिस्थिती अनुभवली. त्यावेळी संबंधित बस चालक मोबाईल फोनवर बोलत गाडी चालवत होता’ असं लिहित ट्विटराईटने बेस्ट, मुंबई महापालिका, मुंबई वाहतूक पोलीस यांना टॅग केले आहे. नम्रपणे विनंती करुनही बस चालकाने व्हिडिओ कॉल कट करण्यास नकार केल्याचा दावा त्याने केला आहे.

    मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात, अर्टिगा शिवशाहीवर धडकली, सुप्रसिद्ध निवेदकाचा जागीच मृत्यू

    कुर्ला स्टेशनहून सांताक्रुझ पूर्वेला जाणाऱ्या MH 01 DR 8377 या बसमध्ये दहा मार्च रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचंही त्याने म्हटलं आहे. मॅन्युअल टाटा मार्कोपोलो बनावटीची बस तो चालवत आहे. अलिकडच्या काळात आगीच्या घटनांसाठी या बस कुप्रसिद्ध आहेत. अशा बेजबाबदार आणि निष्काळजी चालकांनी गाडी नीट न चालवल्यामुळे आणि इंजिनवर ताण दिल्याने या बसेसना आग लागतात यात शंका नाही. याप्रकरणी कारवाई होईल, अशी आशा ट्विटर युझरने व्यक्त केली आहे.

    पाहा व्हिडिओ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed