• Thu. Sep 10th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान

ByMH LIVE NEWS

Feb 27, 2023
‘दिलखुलास’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान

मुंबई, दि.२७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालाय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात लोककला अभ्यासक आणि लोककला विषयाचे प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयाआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० यावेळेत प्रसारित होईल.

२७ फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिन आहे. हा दिवस मराठीभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनस्तरावर अनेक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा.चंदनशिवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed