• Sat. Sep 21st, 2024

नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 16, 2022
नव्या पिढीसाठी नवीन पद्धतीने साहित्य निर्मिती व्हावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा – महासंवाद

चंद्रपूर, दि. 16 : अनेक हालपेष्टा सहन करून साहित्यिक पुस्तक लिहितोत्याचं  प्रकाशन होतं. मात्रपुस्तक विकत घेणाऱ्यांची संख्या हल्ली कमी झाली आहे. पर्यायाने वाचकांची संख्या घटते आहे. मगसाहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहाेचेल, हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विचार करून भविष्यात पुस्तके नवीन पद्धतीने यावीतअशी अपेक्षा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे व्यक्त केली. 68 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी  संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक वि. स. जोगस्वागताध्यक्ष गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारेआमदार अभिजीत वंजारीमाजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्राॲड फिरदौस मिर्झाश्रीधर काळेरवींद्र शोभणेमाजी आमदार सुदर्शन निमकरश्रीराम कावळेइको – प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रेप्रा. अशोक जीवतोडेप्रशांत पोटदुखेविदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दातेसुर्यांशचे अध्यक्ष इरफान शेखमाजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित यांची मंचावर उपस्थिती होती.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले कीचंद्रपूरचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजिरीतून क्रांती घडली. चिमूरच्या स्वातंत्र्याची घोषणा बर्लिनच्या आकाशवाणीवरून झाली. अशा चंद्रपूर जिल्ह्यात साहित्य संमेलन होत आहेही सौभाग्याची गोष्ट आहे. साहित्य संमलेनातून विविध चर्चासत्राच्या माध्यमातून चिंतन व्हावेअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मानसिक प्रदूषण दूर करण्यासाठी साहित्य महत्वाचे ठरते. त्यासाठी विदर्भ साहित्य संघावर मोठी जबाबदारी आहे. भारतमातेच्या हृदयाच्या स्थानी असलेल्या विदर्भात साहित्याची धार निर्माण होईल. हे साहित्य संमेलन ऊर्जा देणारे केंद्र बनावेअसेही ते म्हणाले.

याप्रसंगी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात प्राचार्य मदन धनकरडॉ. शरदचंद्र सालफळेडॉ. अशोक जीवतोडेबंडू धोतरे यांचा समावेश होता.

प्रास्ताविक डॉ. प्रमोद काटकर यांनी संचालन प्रा. रमा गोलवळकर यांनी केले.

००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed