मुंबई, दि. १६: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कळसूत्रीकार मीना नाईक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. १९, मंगळवार २० व बुधवार २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.
कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून समजप्रबोधन करणाऱ्या, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कळसूत्रीकार मीना नाईक यांनी आपल्या सादरीकरणातून बालकांच्या समस्या समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना संगीत नाटक अकादमीने नुकताच पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कोणकोणते विषय हाताळले आहेत, तसेच ही कला काय आहे याबाबतची माहिती त्यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक स्नेहा आघारकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
0000