• Mon. Sep 14th, 2026

विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ByMH LIVE NEWS

Dec 6, 2022
विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूरच्या मुंबई स्थित वाणिज्यदूतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन केले.

राज्याच्या पर्यटन विभागाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अर्जेंटिनाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख मारिया यापूर, आयर्लंडचे कौन्सिल जनरल अल्सोन रीलेटी, इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल अगुस सप्तनो, सिंगापूरचे कौन्सिल जनरल झिकिचेस, श्रीलंकेचे कौन्सिल जनरल वलस्तन वाठोडी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा आणि मुख्य व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल  यावेळी उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed