• Mon. Nov 25th, 2024

    बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी

    ByMH LIVE NEWS

    Nov 18, 2022
    बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर वापरावर बंदी

    मुंबई, दि. 18 : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाईट एअर क्राफ्ट, पॅराग्लायडर, हॅण्ड ग्लायडर हॉट एअर बलून यांच्या वापराबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. दि. 12 डिसेंबर 2022 पर्यंत हे लागू असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी कळविले आहे.

    बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू करण्यात आले आहेत. तथापि, ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे अशांसाठी हा आदेश शिथिल असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *