• Thu. Sep 10th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याचा वृत्तान्त

ByMH LIVE NEWS

Nov 4, 2022
‘दिलखुलास’ कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याचा वृत्तान्त

मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या महारोजगार मेळाव्याचा वृत्तांत प्रसारित होणार आहे. हा वृत्तांत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शनिवार दि. 5 व सोमवार दि. 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील तरूणांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी दहा लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने यशवंराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश दिला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले आहे. या महारोजगार मेळाव्याचा वृत्तान्त ‘दिलखुलास’मध्ये ऐकता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed