• Mon. Nov 25th, 2024

    महाबळेश्वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    ByMH LIVE NEWS

    Oct 29, 2022
    महाबळेश्वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

    सातारा दि.29 : महाबळेश्वर येथील पर्यटनविषयक विविध विकास कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जिल्हा प्रशासनाला सुचविलेली होती. या विकास कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा या विश्रामगृहात घेतला.

    या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील.  यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी श्री. देसाई यांनी महाबळेश्वर शहरातील पार्किंग व्यवस्था, पर्यटन स्थळांचा विकास, अंतर्गत रस्ते तसेच महाबळेश्वर परिसरालगतची पर्यटन स्थळे विकसित करण्याबाबत कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. ही कामे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुचविलेली आहेत. ही कामे जलद गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed